Banjara youth : एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणुन बंजारा तरुणाची आत्महत्या

Banjara youth : एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणुन बंजारा तरुणाची आत्महत्या

Banjara youth

विशेष प्रतिनिधी

उमरगा : Banjara youth  उमरगा तालुक्यातील नाईक नगर तांडा येथील एका 32 वर्षीय तरुणाने बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट नुसार एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना शनिवारी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. Banjara youth

बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी उमरगा तालुक्यातील नाईक नगर येथील ३२ वर्षीय पवन गोपीचंद चव्हाण या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. चव्हाण यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत “मा. मुख्यमंत्री साहेब, बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण द्या” असा मजकूर लिहिलेला आढळून आला आहे. पवन चव्हाण हे बी. कॉम तृतीय वर्षापर्यंत शिक्षण घेतलेले होते. त्यांच्या मागे पत्नी रूपाली, तीन वर्षांचा मुलगा रुद्र, पाच वर्षांची मुलगी रितिका आणि आई द्रोपदाबाई असा परिवार आहे.



बंजारा समाज हा सध्या एनटी (ए) प्रवर्गात आहे. मात्र, हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात जाण्याची शक्यता आहे.

हैद्राबाद गॅझेटीयर’च्या आधारावर बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची समाजाची मागणी सुरु झाली आहे. जर ‘हैद्राबाद गॅझेटीयर’च्या आधारावर मराठा समाजाला ‘कुणबी प्रमाणपत्र’ मिळत असेल तर त्याच गॅझेटीयरमध्ये ‘आदिवासी’ उल्लेख असलेल्या बंजारा समाजावर अन्याय का?, असा प्रश्न बंजारा समाजाकडून उपस्थित करण्यात आला आहे. आजच्या मुंबईच्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित होईल. अनेक जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाकडून सरकारला आदिवासीतून आरक्षणासाठीचे निवेदन सरकारला पाठवण्यात आले आहे. Banjara youth

तत्कालीन निजाम सरकारच्या ‘हैद्राबाद गॅझेटीयर’मध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख आहे. सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला ‘विमुक्त भटक्या जमाती’ (Nomadic Tribe) NT प्रवर्गाचे आरक्षण. देशातील अनेक राज्यांमध्ये तेथील राज्य सरकारकडून बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश. आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर आता बंजारा समाजही ‘हैद्राबाद गॅझेटीयर’चा आधार घेत आरक्षणाचं आंदोलन तीव्र करण्याची शक्यता आहे. Banjara youth

Banjara youth commits suicide seeking reservation from ST category

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023