विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वभावाशी मॅच असणारा माणूस आहे. ठाकरे गटाने कितीही प्रयत्न केले तरी ते आता थांबणार नाहीत असा दावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.
कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. आपल्या क्षमतेचा पक्षात योग्य वापर होत नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. यावर संजय राऊत यांनी ते नाराज नसल्याचे म्हटले आहे. यावर शिरसाट म्हणाले, भास्कर जाधव यांना तुमची भूमिका आवडत नाही हे त्यांनी वारंवार सांगितलेला आहे. भास्कर जाधव हा रांगडा माणूस आहे. शिंदे यांच्या स्वभावाला मॅच असणारा माणूस आहे. तुम्ही कितीही त्यांच्या आरती ओवाळायचा प्रयत्न केला तरी सुद्धा भास्कर जाधव तुमच्याकडे आता राहणार नाही, असे चित्र तयार झालेला आहे. तो माणूस फक्त वेळेची वाट पाहत आहे.
भास्कर जाधव तुमच्या बरोबर राहणार नाही. तुम्ही कितीही तारीफ करून, साहेब म्हणून काहीही केलं तरी आता भास्कर जाधव त्यांच्याबरोबर राहणार नाही हे जवळपास निश्चित झालेलेआहे, असे सांगत ते शिंदे गटात येणार असल्याचे स्पष्ट संकेत शिरसाट यांनी दिले.
Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
ऑपरेशन टायगरवर शिरसाट म्हणाले, मुंबईत जवळपास 35 नगरसेवक आमच्याकडे आले. संभाजीनगर मध्ये 20 ते 22 नगरसेवक आले. सहा महापौर आले, मला सांगा उबाठा गट राहिला तरी कुठे? मुंबई महापालिकेसहित महाराष्ट्रातल्या महानगरपालिका कशा काबीज करायच्या हा आमचा प्रयत्न राहणार आहे. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कोण कुठे जाते हे करण्यापेक्षा आपला पक्ष कुठे चाललाय याकडे लक्ष द्या. पक्षाची तुमची असलेली वाताहात. थांबवण्यासाठी काहीतरी बडबड करून पक्ष वाढत नसतो, हे त्यांना कधी कळेल देव जाणे.
लवकरच होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये आमची भूमिका ही महायुती म्हणून लढवाव्यात अशी आहे .काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे म्हणून जर एखाद्या दोन ठिकाणी आपण युती म्हणून लढलो नाही तरी त्याचा परिणाम मतदारांवर होतो, असे शिरसाट म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वबळावर लढण्याबाबत वक्तव्य केले आहे. यावर शिरसाट म्हणाले, महायुतीबाबत निर्णय स्थानक पातळीवर व्हायला लागले तर मग युती होणार नाही असं एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे त्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. महायुती म्हणून लढलो तर महायुतीचे जे मतदार आहेत ते भरभरून आपल्याला मतदान करू शकतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला भरभरून मते मिळतील. या गोष्टी मी एकनाथ शिंदे यांच्या कानावर हे टाकणार आहे.
दोन तास ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या या संजय राऊत वक्तव्यावर हल्लाबोल करताना शिरसाट म्हणाले, तुमच्या हातामध्ये बांगलादेश घ्या. तुमचं जे काही कर्तुत्व आहे आणि त्यामुळे तिथे जा. काहीही स्टेटमेंट करतात. यंत्रणा कोणाच्या बांधील नाहीत. त्यांना स्वतंत्र अधिकार आहे. प्रत्येक गोष्ट ही कायद्याच्या चौकटीत बसून केली जाते. नाहीतर तुमच्यासारखे बोंबलणारे लोक कधी आता बाहेर असते का? तुमच्यावर आजही अनेक केसेस आहेत. पत्राचाळीपासून तर खिचडी घोटाळ्यापर्यंत. जर सरकारने ठरवलं तर तुम्ही सर्व जण जेलमध्ये दिसणार आहात. म्हणून तुम्ही इतरांना आव्हान देण्यापेक्षा स्वतः केलेले पाप धुण्याचा प्रयत्न करा.
Bhaskar Jadhav will not stay in the Thackeray fraction, claims Sanjay Shirsat
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
- ”पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी अमेरिकेने रचला होता कट”
- Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करणारे दोघे गजाआड
- Sharad Pawar : शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला, एकनाथ शिंदेंच्या सत्कारामुळे भडकले संजय राऊत