विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : “उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक संविधानिक नियमानुसार व्हायला हवी. पण, भाजपचे चारित्र्य काही चांगले नाही. प्रत्येक निवडणुकीत पैशांचा वापर करायची त्यांना चटक लागली आहे, असा आराेप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. Sanjay Raut
देशाच्या 15 व्या उपराष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक आज, मंगळवारी (9 सप्टेंबर) होत आहे. या निवडणुकीमध्ये एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. यावेळी एनडीएकडून सी. पी. राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात ही थेट लढत होणार आहे. पण या निवडणुकीमध्ये बीजेडी, शिरोमणी दल आणि बीआरएस हे निवडणुकीत सहभाग घेणार नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ते मतदान करणार नसून याचा फटका थेट भाजपला बसणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मी असे म्हणत नाही की, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पैशाचा वापर होत आहे. कारण इंडिया आघाडीची मते ठाम आहेत. अर्थात काही विरोधी पक्षांमधील लोकांनी भूमिका बदलली आहे, असेही त्यांनी सांगितले.
संजय राऊत म्हणाले की, “बीजेडी, शिरोमणी दल आणि बीआरएस हे तटस्थ आहेत. या पक्षांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला हा भाजपला धक्का आहे. कारण, विधेयकांना पाठींबा देणारे एनडीएला मतदान करणार नाही हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. हा मोदी, शहांच्या राजकारणाला मोठा धक्का आहे. भविष्यात काय होऊ शकते? याचा हा अंदाज आहे.” असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. भाजप म्हणते की 100 पेक्षा अधिक मतांनी आम्ही निवडून येऊ, यावर संजय राऊत म्हणाले की, “ते असेही म्हणू शकतात की, आमच्या उमेदवाराला मतेच पडणार नाही. त्यांच्यात आणि आमच्यात 40 मतांची तफावत आहे हे आम्ही मान्य करतो. त्यांच्याकडे त्यांच्या मित्रपक्षांसाहित बहुमत आहे. तरीही आम्ही बी. सुदर्शन रेड्डी यांना मैदानात उतरवले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर त्यांनी एक विधान केले होते की, लोकांना वाटले माझी राख होत आहे. पण मी भरारी घेतली. यावर संजय राऊत म्हणाले की, ते जे बोलले ते बरोबर बोलले आहेत. फिनिक्स पक्ष हा राखेतून भरारी घेतो. त्यांनी शिवसेनेचे उदाहरण दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपवण्याचे काम केले, पण शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहणार आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःची तुलना जर फिनिक्स पक्षाशी केली असेल तर त्यांची राख रांगोळी करण्याचा प्रयत्न त्यांच्याच सहकाऱ्यांनी केला आहे.
BJP Addicted to Using Money in Every Election, Alleges Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा