पाकिस्तानचा भोंगा’ म्हणत संजय राऊतांवर भाजपचा व्यंगचित्रातून हल्ला

पाकिस्तानचा भोंगा’ म्हणत संजय राऊतांवर भाजपचा व्यंगचित्रातून हल्ला

Sanjay Raut

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’वर टीका करणाऱ्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भारतीय जनता पक्षाने जोरदार हल्लाबोल केला आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून राऊत यांना पाकिस्तानशी थेट जोडत त्यांच्यावर टीका करण्यात आली असून, त्यांना ‘पाकिस्तानचा भोंगा’ असे संबोधले गेले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत प्रत्युत्तर कारवाई केली. मात्र या कारवाईच्या यशस्वीतेबाबत खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केल्या. विशेष म्हणजे, पाकिस्ताननेही याच ऑपरेशनबाबत अपयशाचा दावा केला आहे. हाच धागा पकडत भाजपने राऊतांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली.

या व्यंगचित्रात भारत व पाकिस्तानचे प्रतिकात्मक नकाशे दाखवले आहेत. पाकिस्तानकडून एक हात पुढे आलेला असून, त्यावर ‘पोपट’ बसलेला दाखवण्यात आला आहे. या पोपटाचे चेहरा संजय राऊत यांच्यासारखा दाखवण्यात आला आहे, जो ‘ऑपरेशन सिंदूर अपयशी ठरले’ असे बोलताना दाखवला आहे. या चित्रातून संजय राऊत यांना पाकिस्तानच्या प्रचार यंत्रणेचा ‘भोंगा’ म्हणून सादर करण्यात आले आहे.

या पोस्टला #OperationSindoor आणि #ShameOnUBT असे हॅशटॅग जोडून भाजपने ती अधिक तीव्र केली आहे. त्यामुळे ठाकरे गट किंवा खासदार संजय राऊत यांच्याकडून यावर काय प्रत्युत्तर येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

BJP attacks Sanjay Raut through cartoon, calling him ‘Pakistan’s bhonga’

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023