विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : भाजप आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. Prasad Lad
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी प्रसाद लाड हे काल रात्रीपासून शहरात मुक्कामी होते. याच दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी फोन करून त्यांना गंभीर धमक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. “हॉटेलमध्ये घुसून हल्ला करू”, “गाडी फोडून टाकू”, अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्याने पोलिस प्रशासन तातडीने सतर्क झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद लाड हे शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये थांबले होते. रात्री उशिरा त्यांच्या मोबाईलवर वारंवार धमकीचे फोन येऊ लागले. सुरुवातीला या कॉल्सकडे दुर्लक्ष करण्यात आले, मात्र धमक्यांचा सूर अधिक आक्रमक होत गेल्यानंतर लाड यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.
तपासादरम्यान पोलिसांनी योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले या दोघांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर दोघांनाही अटक करण्यात आली. आंदोलन सुरू असताना प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत होते, मग आता अचानक भेट घेण्यामागचे कारण काय, असा सवाल करत संतप्त प्रतिक्रियेतून धमक्या देण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिसांनी दोघांचे मोबाईल जप्त केले असून कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.
या घटनेनंतर प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हॉटेल परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजप पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे धमक्या देणे गंभीर बाब असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सर्व घडामोडींनंतरही प्रसाद लाड आज सकाळी अंतरवाली सराटीकडे रवाना झाले. ते लवकरच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
BJP MLA Prasad Lad receives death threats during visit to meet Manoj Jarange; two arrested
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश
- मराठा युवकांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी