विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vijay Wadettiwar लाडक्या बहीण म्हणून मिरवणाऱ्या महायुती सरकारला त्यांच्याच केंद्रीय मंत्र्यांनी आरसा दाखवला आहे. आता तरी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री जागे होणार आहेत का? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले यांनी केला आहे.Vijay Wadettiwar
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर दोन दिवस होऊन देखील आरोपींना पकडण्यात आलेले नाही, यावरुन विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘आरोपींना पकडण्यासाठी मंत्र्यांना थेट पोलिस स्टेशन गाठावे लागले. आम्ही कधीपासून सांगत आहोत राज्यात पोलिसांचा धाक राहिला नाही, कारण गुंडाना महायुतीचे राजकीय संरक्षण मिळत आहे. पोलिस सुरक्षा असताना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची बातमी हे महाराष्ट्रातील वास्तव आहे,
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, ‘पोलिस सुरक्षा असताना केंद्रीय मंत्र्यांच्या मुली आज महाराष्ट्रात सुखरूप नाही, तिथे शेतात, नोकरीवर जाणाऱ्या सामान्य आई-वडिलांच्या मुली दररोज स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काय ‘स्ट्रगल’ करत असतील आणि किती मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागत असेल, हा अंदाज महायुतीतील मंत्र्यांना नाही.
पीडितेचे आजोबा माजी मंत्री एकनाथ खडसे आणि आई केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रार देऊन दोन दिवस झाले तरी पोलिसांकडून आरोपींवर कारवाई झालेली नाही. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी जर महाराष्ट्रातील पोलीस कारवाई करत नसतील तर सर्वसामान्य आई-वडिलांच्या लेकी बाळींच्या सुरक्षा कशी असणार, असा सवाल वडेट्टीवार
BJP Union Ministers Show Mirror To Mahayuti Government, Vijay Wadettiwar’s Attack
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…