विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ladki Bahin scheme राज्यात लोकसभा निवडणुकांच्या आधी सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली. सरकारने या योजनेची घोषणा केल्यापासूनच ही योजना कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. कधी विरोधकांनी केलेला आरोपांमुळे तर कधी महिलांना हप्ते उशिरा मिळाल्यामुळे.
मात्र आता या योजने बाबत एक मोठा घोटाळा समोर आला आहे. लाडकी बहीण योजनेनुसार केवळ २.५ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता. विशेष म्हणजे यात कार्यरत सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी यांना या योजनेचा लाभ घेण्यास स्पष्ट मनाई आहे. मात्र तरीदेखील काही महिलांनी याबाबत जाणीवपूर्वक शासनाची फसवणूक केली आहे. याबाबत महिला व बालकल्याण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने त्या संदर्भातील सर्व बोगस लाभार्थ्यांची एक यादी तयार केली आहे. या यादीत जिल्हा परिषदेतील कर्मचारी, शिक्षक, विविध शासकीय विभागातील महिला कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचारी अशा आठ हजाराहूनही अधिक महिलांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Ladki Bahin scheme
या योजनेचा उद्देश केवळ गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक मदत करणे हा होता.मात्र, प्रत्यक्षात अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवत या योजनेचा लाभ घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सध्या गैरप्रकार करणाऱ्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांची संख्या ८ हजारांपेक्षा अधिक असल्याचे उघड झाले आहे. यामुळे प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, लाभ मिळविणाऱ्या पात्र महिलांना अन्याय सहन करावा लागत असल्याचे मानले जात आहे.
या गैरप्रकारानंतर वित्त विभागाने तत्काळ कारवाईची तयारी केली असून, सुमारे १५ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. ही वसुली दोषी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून किंवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधून टप्याटप्याने तसेच काही प्रकरणांत एकरकमी पद्धतीने केली जाणार आहे. यासाठी वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्यात समन्वय साधला जात आहे. Ladki Bahin scheme
शासनाने स्पष्ट केले आहे की, कोणालाही गैरप्रकारातून लाभ घेऊ दिला जाणार नाही याशिवाय दोशींवर केवळ वसुलीची कारवाईच नव्हे तर शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचाही विचार सुरू आहे. महाराष्ट्र दिवाणी सेवा (आचरण, शिस्त आणि अपील) नियम १९७९ नुसार संबंधित महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. शासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील काही दिवसांत दोषींविरुद्ध कठोर निर्णय घेतला जाईल. त्यामुळे या योजनेतून अनुचित लाभ घेणाऱ्यांना दंडाला सामोरे जावे लागणार हे निश्चित आहे. Ladki Bahin scheme
Bogus beneficiaries of Ladki Bahin scheme will have to pay fine; Order to recover Rs 15 crore
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!