विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनावर तोडगा निघाला असला तरी आता सरकारला इतर मागासवर्गीय (ओबीसी) संघटनांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत आपली नाराजी व्यक्त केली. Chagan Bhujbal
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासंबंधीचा जीआर मंगळवारी सरकारने काढला, यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याचे समोर आले आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित मंत्रिमंडळ बैठकीला हजर झालेले मंत्री छगन भुजबळ हे कॅबिनेट बैठकीला अनुपस्थित आहेत. त्यामुळे
मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची प्री-कॅबिनेट बैठक झाली, त्या बैठकीनंतर कॅबिनेट बैठकीच्या पाच मिनिट आधीच छगन भुजबळ निघून गेले. ते मंत्रिमंडळात जीआर संबंधी नाराजी व्यक्त करतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. ते सह्याद्री अतिथीगृह येथून निघून गेले. त्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. Chagan Bhujbal
छगन भुजबळ यांनी आज सकाळी मंत्रिमंडळ बैठकीला जाण्यापूर्वी सरकारने मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्रासाठी काढलेल्या जीआरचा आम्ही अभ्यास करत असल्याचे म्हटले होते. वेळ पडली तर न्यायालयातही जाणार अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर भुजबळ मंत्रिमंडळ बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्री-कॅबिनेट मिटिंगला त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर पुढील पाच मिनिटात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु होणार होती, तत्पूर्वीच भुजबळांनी सह्याद्री अतिथीगृह येथेून काढता पाय घेतला. ते कॅबिनेट मिटिंगला अनुपस्थित होते.
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून छगन भुजबळ कोणासोबत काहीही न बोलता सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडले. त्यानंतर ते थेट एमईटी येथे पोहोचले. तिथे ते ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. Chagan Bhujbal
Chagan Bhujbal boycotts cabinet meeting, displeasure over Maratha reservation GR
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल