विशेष प्रतिनिधी
मुंबई : एक रुपया पीकविमा योजनेत मागील काही दिवसांपासून गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पीकविमा योजनेत बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पीकविमा कंपन्यांऐवजी शेतकऱ्यांना अधिक लाभ व्हावा, यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात यापुढे सुधारित पीकविमा योजना लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.
एक रुपयात विमा योजनेत लाखो बोगस अर्ज समोर आले आहेत. लोकांनी निधीचा अपव्यय करणारे षडयंत्र केले आहे. अशा गोष्टीमुळे गरजू व्यक्ती या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी आम्ही सुधारित योजना आणणार आहे. जेणेकरून विमा कंपन्यांचा नव्हे तर शेतकऱ्यांचा लाभ व्हायला हवा, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
“विमा कंपनीचा लाभ न होता शेतकऱ्यांचा लाभ झाला पाहिजे, हा विचार समोर ठेवून ही योजना नव्याने तयार करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणं, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करणे यात ट्रॅक्टर, ड्रीप, मल्चिंग पेपर, बीबीएफ अशा वेगवेगल्या गोष्टींत गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र योजना राज्याच्या मंत्रिमंडळाने पारित केली आहे.आज 9 साईट्सवर पंप स्टोअरेजचे करार केले आहेत. त्यामधून 8 ते 8 हजार 500 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
Changes in crop insurance scheme at one rupee due to fraud, CM informs
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती