विशेष प्रतिनिधी
मुंबई: माझे काय चुकले? मी काय वाईट वागलो ते त्यांनी तिथे सांगावं. या सगळ्या गोष्टीचा जाब मी दादांनाच मुंबईला जाऊन विचारणार आहे, असे म्हणत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे मुंबईला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट निघाले आहेत. Vijaykumar Ghadge
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना रविवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झाली होती. याबाबत बोलताना घाडगे म्हणाले, सुरज चव्हाण याने माझ्यावर प्राण घातक हल्ला केला. पोलिसांचा जावई असल्यासारखा तो येतो काय आणि जमीन घेऊन जातो काय, सगळंच वाईट आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांवर याबाबत कारवाई होत नाही. मात्र सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकत निवेदन देणाऱ्या माझ्यासारख्या शेतकरी कार्यकर्त्यावर प्राण घातक हल्ला होतो. हे योग्य नाही. यामुळे मी आत थेट मुंबईकडे निघालो आहे. अजित पवार यांनाच मी याबाबत जाब विचारणार . सुनील तटकरे हे दादाला भेटताना समोर यावेत. मी काय वाईट वागलो ते त्यांनी तिथे सांगावं.
विजयकुमार घाडगे यांना रविवारी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकत निवेदन दिल्या कारणाने त्यांना मारहाण झाली होती. याप्रकरणी सुरज चव्हाण यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यातील नऊ लोकांना ताब्यात घेत कारवाई करून सोडून देण्यात आलं. अवघ्या दोन तासांमध्ये हे सगळे बाहेर पडले. यामुळे छावा संघटनेतील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
घाडगे यांच्याकडे अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराची सर्व साधने काढत त्यांनी स्वीट ॲम्बुलन्समध्ये बसून मुंबईकडे प्रयाण केला आहे. मराठवाड्यातील अनेक भागातील आलेले पदाधिकारी त्याच्या सोबत निघाले आहेत.
Chhawa Sanghatana’s state president Vijaykumar Ghadge will directly ask Ajitdada for an answer.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला