विशेष प्रतिनिधी
गोंदिया : Bachchu Kadu शेतकऱ्यांच्या सभेत शेतकरी आत्महत्येच्या विषयावर बोलत असताना स्टेजच्या बाजुला उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजविल्याने माजी मंत्री व प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू संतप्त झाले. मध्येच भाषण थांबवित टाळ्या वाजविणाऱ्या कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढली. टाळ्या वाजवितो नालायक मारू थोबाडीत एक असा संताप व्यक्त केला. Bachchu Kadu
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू शेतकरी हक्क यात्रेसाठी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. आमगाव तालुक्यातील ठाणा येथे शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. परभणी येथील सचिन जाधव या शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या अत्यंत संवेदनशिल विषयावर भाष्य करीत होते. हे भाष्य करीत असताना स्टेजच्या बाजुला बसलेल्या कार्यकर्त्याने टाळ्या वाजविल्या. यावर बच्चू कडू यांनी हा काय टाळ्या वाजविण्याचा विषय आहे काय असे बजावित कार्यकर्त्याला स्टेजवरुनच चांगले खडसावले. Bachchu Kadu
सरकारवर टीका करताना बच्चू कडू म्हणाले, सरकार शेतमालाला हमीभाव देत नाही, बोनस व चुकाऱ्याचे पैसे वेळेवर शेतकऱ्यांना देत नाहीत. हे राज्यातील महायुती सरकार हे शेतकरी हितेशी नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अशा सरकारला आता शेतकऱ्यांनीच धडा शिकावावा. Bachchu Kadu
राज्यातील महायुती सरकार दिव्यांगाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. मात्र आपण दिव्यांग बांधवांवर अन्याय होवू देणार नाही. दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसाठी २८ सप्टेंबरला मोठे आंदोलन करण्याचा इशारा कडू यांनी दिला.
Clapping is useless, beating is a crime, Bachchu Kadu’s anger at the workers in the meeting
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा