विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chhagan Bhujbal आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करणार आहोत, कायद्याच्या लढाईत आमचाच विजय होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्याला लढण्याचा इतिहास आहे. आताही सर्वांनी लढाईसाठी घराबाहेर पडले पाहिजे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केले.
पत्रकारांशी बोलताना ओबीसी बांधवांना आत्महत्या न करण्याचे आवाहन करत भुजबळ म्हणाले, ओबीसी समाजाच्या 10 जणांनी आतापर्यंत मृत्यूला कवटाळले आहे. राज्यात मोठी विदारक परिस्थिती आहे. आता आपले सर्व संपले आहे अशी ओबीसींमध्ये निर्माण झाली आहे. मला आपल्याद्वारे आमच्या सर्व ओबीसी मंडळींना कळवायचे आहे की, कुणीही काळजी करू नका. आत्महत्या करण्याच्या वाटेला तर अजिबात जाऊ नका. कारण आरक्षणाच्या लढाईत ओबीसींचाच विजय होणार आहे. Chhagan Bhujbal
दलित, आदिवासी व ओबीसी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या व संसदेने मंजूर केलेल्या संविधानाच्या पोटचे घटक आहेत. त्यामुळे आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही आपल्या प्रयत्नांची शिकस्त करणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही त्यात विजय मिळवणार. आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. सरकार व जे कुणी पुढारी असतील या राज्यात, त्यांनी ओबीसींना शक्ती द्यावी, असे आवाहन भुजबळ यांनी केले. Chhagan Bhujbal
छगन भुजबळ म्हणाले, आम्ही हायकोर्टातही रिट अर्ज दाखल केलेत. त्यासाठी चांगले वकील लावलेत. कुणबी समाज, नाभिक समाज, माळी महासंघ, समता परिषद आदी वेगवेगळ्या संघटनांचा यात समावेश आहे. या प्रकरणी आम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असा आमच्या सीनिअर वकिलांचा दावा आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही मार्गाने प्रयत्न करत असताना कुणीही आत्महत्येचा विचार करता कामा नये. किंबहुना सगळ्यांनी शक्ती लावून, जिथे जिथे आपल्याला सभा घेता येतील तिथे सभा घ्याव्यात. आमची बीडला एक सभा होत आहे. तिथे या. लोकांना आपला प्रचंड महासागर दाखवूया. ओबीसीतील वेगवेगळे समाज आपापल्या ताकदीने सभा घेत आहेत, मोर्चे काढत आहेत. महात्मा फुले समता परिषदेतर्फे तहसील, कलेक्टर व इतर अधिकाऱ्यांना निवेदने देत आहेत. काही ठिकाणी उपोषणेही केली जात आहेत. सर्वजण या लढाईत आपले योगदान देत आहेत. Chhagan Bhujbal
Come out of your homes to fight for reservation: Chhagan Bhujbal’s appeal to OBCs
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!