Congress काॅंग्रेसची २३ जणांची यादी जाहीर, लहू कानडे यांना नाकारली उमेदवारी

Congress काॅंग्रेसची २३ जणांची यादी जाहीर, लहू कानडे यांना नाकारली उमेदवारी

विशेष प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.  हेमंत ओगले यांना श्रीरामपूर विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी नाकारली आहे. श्रीरामपूर काँग्रेसमधील अंतर्गत दोन्ही गटांचा वाद चव्हाट्यावर आला होता. काँग्रेस श्रेष्ठींनी विद्यमान आमदाराला नाकारत नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे.

दुसऱ्या यादीत 23 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. यात तीन महिलांना विधानसभेचं तिकीट दिली आहे. जळगाव- जामोदममधून स्वाती विटेकर, सावनेरमधून अनुजा केदार, भंडाऱ्यातून पूजा ठावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काही विद्यमान आमादारांचाही पत्ता कट करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या शिरोळची जागा काँग्रेसला स्वत: कडे ठेवण्यात यश आलं आहे. श्रीरामपूरच्या जागेवर काँग्रसने धक्कातंत्र अवलंबलं आहे.

काॅंग्रेसचे उमेदवार :

१. भुसावळ- राजेश मानवतकर

२. जळगाव, जामोद- स्वाती विटेकर

३. वर्धा- शेखर शेंडे

४. सावनेर- अनुजा केदार

५. नागपूर दक्षिण- गिरीश पांडव

६. कामठी- सुरेश भोयर

७. भंडारा- पूजा ठावकर

८. अर्जुनी मोरगांव- दिलीप बनसोड

९. आमगाव- राजकुमार पुरम

१०. राळेगाव- वसंत पुरके

११. यवतमाळ- अनिल मंगुलकर

१२. अरणी- जितेंद्र मोघे

१३. उमरखेड- साहेबराव कांबळे

१४. जालना- कैलास गोरंट्याल

१५. छत्रपती संभाजीनगर पूर्व- मधुकर देशमुख

१६. वसई- विजय पाटील

१७. कांदिवली पूर्व- काळू पडलिया

१८. चारकोप- यशवंत सी.

१९ सायन- गणेश यादव

२०. श्रीरामपूर- हेमंत ओघळे

२१. निलंगा- अभयकुमार साळुंखे

२२. शिरोळ- गणपतराव पाटील

२३. अकोट – महेश गणगणे

शिरोळमधून गणपतराव पाटील यांना उमेदवारी

कोल्हापूरच्या शिरोळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गणपतराव पाटील हे शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि काँग्रेसचे माजी आमदार आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांचे सुपुत्र आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिरोळची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी सतेज पाटील यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. शिरोळमध्ये आता अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर विरुद्ध काँग्रेसच्या गणपतराव पाटलांमध्ये सामना रंगणार आहे.

श्रीरामपूरमध्ये मोठा काँग्रेसने मोठा बदल केल्याचं दिसत आहे. काँग्रेसकडून धक्कातंत्राचा वापर करण्यात आला आहे. विद्यमान आमदार लहू कानडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

Congress Releases List of 23 Candidates, Denies Ticket to Lahu Kanade

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023