विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : काँग्रेस पक्षात मोठा विसंवाद आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष 2029 पर्यंत किंचित पार्टी राहिल. कारण काँग्रेस पार्टी नेतृत्वहीन झाली आहे. त्यांच्या पक्षाचा कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही, असा हल्लाबोल भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
महसूल मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील गडचिरोलीत भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रचार सभा घेतली.
प्रचारावेळी काँग्रेसवर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस सोडून भाजपात आलेल्या एका कार्यकर्त्याचा किस्सा सांगितला. कार्यकर्त्याने आम्हाला सांगितले की, काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार हे नाना पटोले यांचं तोंड बघायला तयार नाहीत आणि नाना पटोले हे विजय वडेट्टीवार यांचं तोंड बघायला तयार नाहीत. विशेष म्हणजे हे दोघेही मिळून सुनील केदार यांचं तोंड पाहायला तयार नाहीत. तसेच हे तिन्ही नेते यशोमती ठाकूर यांना विचारत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे चौघेही मिळून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही विचारत नाहीत. तसेच पाचही जण मिळून राहुल गांधींना विचारत नाहीत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, तुम्ही हिशोबासाठी घाबरू नका. तुम्ही एक पडदा टाकला तर तो आपण निवडणूक आयोगाला 50 रुपयाचा असल्याचं सांगू. मी स्टार प्रचारक आहे. त्यामुळे हिशोब कशाला लागतो? मी राज्यावर आहे, त्यामुळे राज्यात आम्ही हिशेब देऊ. त्यामुळे तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींना उन्हात बसवू नका.
Congress will remain a small party without a leader till 2029, criticizes Chandrashekhar Bawankule
महत्वाच्या बातम्या
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीची धडक बसून नवरा–बायकोसह दोन लहान मुलांचा अपघात
- Uddhav Thackeray : भाजप व संघाकडून मुंबईत भाषिक प्रांतवादाचे विष, उद्धव ठाकरे यांचा आरोप
- Smriti Mandhana : स्मृती मानधना लग्नाच्या तयारीत; सांगलीत सुरू लगबग, टीममेट्सचा व्हायरल डान्स
- Shiv Sena Shinde : शिवसेना शिंदे गटातील किमान 35 आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार, ठाकरे गटाचा दावा



















