विशेष प्रतिनिधी
जळगाव : मंत्री गिरीश महाजन यांना बदनाम करण्यासाठी एकनाथ खडसे आणि मोठे साहेब यांचं षडयंत्र आहे, त्यांनी आपल्या वडिलांना अडकविले आहे, असा आरोप हनी ट्रॅप प्रकरणात अटक झालेले प्रफुल लोढाचे चिरंजीव पवन लोढा यांनी केला आहे. आपल्या वडिलांवर जे तीन गुन्हे दाखल केले आहे, ते सगळे खोटे आहेत. हे जर हनी ट्रॅप प्रकरण असते तर आम्ही नोटांमधे खेळलो असतो. हा सगळा प्रसिध्दी साठी केलेला स्टंट आहे, असेही पवन यांनी सांगितले. Eknath Khadse
आमच्या आर्थिक परिस्थितीबाबत तुम्ही कोणत्याही चौकशा करू शकतात, आमच्याकडे काहीही नाही. मी आता एकनाथ खडसे यांच्याविरोधात न्यायालयात जाणार आहे, त्यांच्यावर लावण्यात आलेला 300 कोटीचा दंड का रद्द झाला, खडसे यांच्या मुलाच्या आत्महत्या प्रकरणी एसआयटी ही नेमली जायला हवी. मागील काळात आपल्या वडिलांमध्ये आणि गिरीश महाजन यांच्यात काही मतभेद झाले होते. मात्र, ते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केले होते पण, ते आता दूर झाले आहेत, असेही पवन लोढा म्हणाले. Eknath Khadse
गिरीश महाजन मोठे नेते असल्याने ते त्यांच्यावर आरोप करत आहेत, आमच्याकडे जी प्रॉपर्टी आहे ती बापजाद्यापासून आहे. खडसे यांनीच उलट भ्रष्टाचार करून पैसे कमवले आहेत. मंत्री गिरीश महाजन हे आमच्यासाठी दैवत आहेत आणि दैवत राहणार असल्याचंही प्रफुल लोढा यांचे चिरंजीव पवन लोढा यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हटलं.
पवन लोढा यांच्या आरोपानंतर आता एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाबाबत मी कधी बोललो नाही आणि यात कुठल्याही मोठ्या साहेबांचा संबंध आला नाही. उलट प्रफुल्ल लोढा यांनी व्हिडिओमध्ये गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांचे नाव घेतले आहे. गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हणत प्रफुल्ल लोढा यांनी त्यांच्याकडे जे काही आहे त्याबाबत सांगितले. प्रफुल्ल लोढा त्यांचे कुटुंब गिरीश महाजनांना भेटले, त्यामुळे मला शंका यायला लागली आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांन दिली.
या प्रकरणांमध्ये जे आता समोर येणारे आहे ते दबावाखाली येतील व त्यांना दाबून पुढे येऊ देणार नाही अशी भीती माझ्या मनात आहे. दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार कर असं मी प्रफुल्ल लोढाला सांगितलं नाही. मुलींवर अत्याचार करून त्यांचे फोटो काढ, या लोकांना हनी ट्रॅपमध्ये अडकव असं मी सांगितलं नाही किंवा त्याला शिकवलं नाही. हा उद्योग त्याने केला, त्याचं पाप असेल तो फेडेल, अशा शब्दात खडसेंनी आपली बाजू मांडली. लोढा पोलिसांच्या ताब्यात आहे, त्यामुळे त्याच्याकडे जे काही आहे किंवा जी काही माहिती आहे ती आता समोर येईल असं वाटत नाही.
त्यामध्ये मंत्र्यांची नावे असल्यामुळे पोलीसच आता त्याचे पुरावे नष्ट करतील. वरिष्ठ आयपीएस आयएस अधिकाऱ्यांचे नाव त्यात आहे, त्यामुळे लोढा प्रकरणात निपक्षपाती चौकशी होईल असं मला वाटत नाही. या प्रकरणाची आता सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करून सत्य बाहेर आणावं. अनेक प्रकरणाच्या सीबीआयच्या चौकशा करण्यात आल्या, मी काही केलं नसताना माझी ही सीबीआय चौकशी करण्यात आली. तशी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे.
गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर अशा पद्धतीचे लोढा कुटुंबीयांचे प्रतिक्रिया येणे यात नवल नाही. या प्रकरणात जो पुरावा देण्यास समोर येईल त्या पुरावेदाराच्या जीविताला सुद्धा धोका राहू शकतो अशी स्थिती आजची आहे. मलाही अनेक फोन येत आहेत, त्यांना देखील बोलायची इच्छा आह. मात्र, भीती जबरदस्त आहे. भीतीपोटी कोणीही समोर येत नाही ही भीती जर कमी झाली किंवा पोलिसांच्या हातून ही चौकशी काढून एसआयटीच्या, सीबीआयच्या हाती दिली तर या प्रकरणात असलेली भीती नष्ट होईल. या प्रकरणाची बरीचशी माहिती माझ्याकडे आहे आणि ती माहिती मला द्यायची आहे, असे मला अनेकांचे फोन आले. नाथाभाऊला भेटलो तर आपल्या मागे कोणी ना कोणी लागेल किंवा पोलीस लागतील त्या भेटीपोटी कोणी स्पष्टपणे सांगत नाही. पण, मी स्वतः हे पाहिलेलं होतं म्हणून मी याबाबत बोलतोय, असेही खडसेंनी यावेळी म्हटलं
Conspiracy of Eknath Khadse and Mote Saheb to defame Girish Mahajan
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला