विशेष प्रतिनिधी
मुंबई : हिंदी सक्तीच्या मुद्यावर बोलताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आमदार आणि सत्ताधाऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर विधिमंडळाचा हक्कभंग केल्याची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सर्व मराठी माणसांना आमचे आव्हान आहे, तुम्ही जर मराठी असाल तर रस्त्यावर उतरा. सरकारमध्ये सर्व षंढ लोक बसले असतील तर मराठी माणसाने करायचे काय?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.
देशपांडे म्हणाले की, मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की, सरकारला अजूनही हिंदीबद्दल का प्रेम आहे हे कळत नाही. मराठी माणसांनी तुम्हाला निवडून दिले आहे. हे तुम्ही विसरू नये. ज्यांनी निवडून दिले तो तुम्हाला घरी पण बसवू शकतो हे लक्षात घ्यावे, असेही देशपांडे यांनी म्हटले. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या सह्यांच्या मोहिमेला बघायला मिळतोय.
महाराष्ट्रातल्या दोन भाषा शिकवल्या जातील, तिसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रात पहिलीपासून नको. बैठकीमध्ये सरकारने याबाबतचा सकारात्मक निर्णय घ्यावा, सध्या तसा सकारात्मक जोर भरपूर आहे. सरकारने सक्तीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा उद्याच रस्त्यावर उतरून आम्ही तांडव करायला लागलो तर मराठी माणसाला आणि महाराष्ट्र सैनिकांना आवरणे सरकारला कठीण होईल.
यावर पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी याबाबत म्हटले आहे की, आपल्या राज्याचे सभागृहाचे ते सदस्य होते. विशेष म्हणजे आज आपल्या सभागृहामध्ये देशाचे लोकसभा अध्यक्ष आले होते. त्यांनाही षंढ म्हणणे उचित आहे का? जे सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बसले आहेत किंवा आमच्यासारखे जे सभासद आहेत, ते षंढ आहेत का? असा सवाल मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.
हे बोलणे उचित नाही. आम्हालाही बोलता येते. पण, आम्ही बोलणार नाही. पण जेव्हा मोकळे मैदान येईल, तेव्हा आम्ही बोलून दाखवू. पण एखाद्या व्यासपीठावर आपली बाजू मांडणे आणि कोणाला षंढ म्हणणे याच्याने त्यांना हुशारकी वाटत असेल तर मग खालच्या पातळीवर जाऊन आम्हालाही बोलता येऊ शकतात. हा सभगृहाचा अपमान आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बरेचशे आमदार यावर हक्कभंग आणल्याशिवाय आणि देशपांडेंना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
Controversial statement against the ruling party, will action be taken against Sandeep Deshpande for violation of rights?
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी