विशेष प्रतिनिधी
पुणे : Laxman Hake मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन महाराष्ट्र सरकारने राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण संपवले असा संताप ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली. सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.Laxman Hake
प्रा. हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर ताेडगा काढण्यासाठी घेतलेल्या निर्णयांवर जोरदार टीका केली. समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, हा निर्णय ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा गळा घोटणारा निर्णय आहे. गावातल्या गावात तपासणी होऊन आता आऱ्क्षण दिले जाईल असे सांगितले गेले. प्रमाणपत्र देताना कसलीही तपासणी केली जाणार नाही. यातून ओबीसी समाजाच्या आरक्षणावर संक्रात येत आहे. मंत्रीमंडळ उपसिमतीचे अध्यक्ष असलेले व हा निर्णय जाहीर करणारे मंत्री राधाकृष्ण विखे यांना त्यांच्या जिल्ह्यातीलही माहिती नाही. तिथे किती ओबीसी, किती मराठे किती कुणबी हे त्यांनी सांगावे. कसलाही अभ्यास नसताना व कोणतीही माहिती न घेता सरकारने हा निर्णय घेतला, याचे कारण आंदोलनापुढे ते हतबल झाले होते.Laxman Hake
सरकारने मंगळवारी आंदोलन समाप्त करताना जाहीर केलेला अध्यादेश संपूर्णपणे बेकायदेशीर आहे अशी टीका करताना प्रा. हाके म्हणाले, गावगाड्यातील ओबीसी समाज तसेच अन्य प्रवर्गातील जाती जमातीमधील सर्वांच्याच आरक्षणाचा घोट सरकारी अध्यादेशाने घेतला आहे. या अध्यादेशामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारने सिद्ध करून दाखवावे. मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्याच्या कामात सुलभता यावी यासाठी हा अध्यादेश आहे असे त्यातच म्हटले आहे, त्याचा अर्थ काय ते त्यांनी महाराष्ट्राला समाजावून सांगावे. उपसमितीत ओबीसी समाजाची माहिती असलेला एकही माणूस नव्हता, विखे यांचा या विषयाचा काहीही अभ्यास नाही, राज्यातील ओबीसी समाजाची विस्ताराने माहिती असणारे समितीत कोणीही नाही, त्यामुळे समितीच पक्षपाती आहे.
Desperate in the face of the Maratha reservation movement, OBC reservation was ended, Laxman Hake will appeal in court
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल