विशेष प्रतिनिधी
मुंबई : पूर्वी आपल्याकडे पुढच्या पिढीला देण्यासाठी सोने सांभाळून ठेवायची. पण सध्या मुंबईमध्ये सोन्यासारखी घरांची किंमत आहे. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना काय द्यायचे? तर ही घरे आपल्या पुढच्या पिढ्यांना द्यायचे आहे, असा विश्वास मनामध्ये ठेवा.” असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. Devendra Fadnavis
वरळी बीडीडी चाळीतील दोन पुनर्वसित इमारतीमधील 556 घरांचा ताबा गुरुवारी घरमालकांना देण्यात आल्या. या घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. Devendra Fadnavis
मुख्यमंत्री म्हणाले की, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. जे स्वप्न आपण पाहिले होते ते अखेर पूर्ण झाले आहे. बीडीडी चाळीने अनेक सामाजिक आंदोलने आणि चळवळी बघितल्या. या 100 वर्षांमध्ये बीडीडी चाळीचा इतिहास पाहिला तर या चाळीच्या भिंतीमध्ये अनेक गोष्टी दडल्या आहेत. अनेकांचे दुःख दडलेले पाहायला मिळतात.
“सातत्याने बीडीडी चाळीचा विकास झाला पाहिजे, अशी मागणी होत होती. काही लोकांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला. तेव्हा मी पाहिले की लोक कशा अवस्थेत राहत आहेत. मला असे वाटले की म्हणायला ती चाळ होती पण झोपडपट्टीपेक्षा बिकट अवस्था होती. म्हणूनच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार आले तेव्हा बीडीडी चाळीचा मुद्दा पहिल्यांदा ऐरणीवर घेतला. यामध्ये अनेक अडचणी आल्या,” असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले. “मला सांगताना आनंद वाटतो की, आपण जबाबदारी घेत त्याचे ग्लोबल टेंडर काढले. वरळीमध्ये टाटा, एलएनटीने हे काम घेतले. 22 एप्रिल रोजी सर्व टेंडर काढून त्याचे भूमिपूजन केले होते. त्यानंतरही अनेक अडचणी आल्या. पण सर्व अडचणींवर मात काढत अत्यंत वेगाने आपण या कामाला सुरुवात केली. आज लोकांना घरे दिली.
बीडीडी चाळीप्रमाणेच आता धारावीचाही असाच पुनर्विकास करू आणि सामान्य मराठी माणसाला हक्काचे घर मिळवून देऊ, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
Devendra Fadnavis appeals to residents of BDD Chawl
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला