विशेष प्रतिनिधी
परळी : Dhananjay Munde नगरपालिका निवडणुकांच्या काळात राज्यातील काही बड्या नेत्यांनी मला जाणीवपूर्वक लक्ष्य करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला, मात्र परळीच्या जनतेने या सर्व षडयंत्रांना धुडकावून लावत महायुतीला भक्कम पाठिंबा दिला, असे विधान आमदार धनंजय मुंडे यांनी केले. ते परळी येथे आयोजित घरकुल वाटप सोहळ्यात बोलत होते.गुढी पाडव्याच्या निमित्ताने परळी नगर परिषद अंतर्गतDhananjay Munde
प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत मंजूर ६७७ लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. यासोबतच ५ टक्के निधीतून दिव्यांग बांधवांना आर्थिक मदतीचेही वाटप करण्यात आले.Dhananjay Munde
मुंडे म्हणाले की, “निवडणुकीच्या काळात माझ्याविरोधात राज्यभर वातावरण तयार करण्यात आले. सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामधूनही मला लक्ष्य करण्यात आले. मात्र परळीच्या जनतेने या सर्व प्रयत्नांना न जुमानता ऐतिहासिक विजय मिळवून दिला.” त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी कोणावर निशाणा साधला, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
घरकुल योजनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आतापर्यंत शहरात सुमारे ३ हजार घरकुलांचे वितरण पूर्ण झाले आहे. यावर्षी आणखी १५०० घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी नगरसेवकांना दिल्या.
परळीचा विकास केवळ भौतिक सुविधांपुरता मर्यादित नसून बौद्धिक विकासालाही महत्त्व दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील नव्याने उभारलेल्या वाचनालयाचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच शहरात सुरू असलेल्या सोलर प्रकल्पांसह विविध विकासकामांमुळे परळीचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Dhananjay Munde Alleges Smear Campaign by Top State Leaders, Targets Opponents
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास