विशेष प्रतिनिधी
धाराशिव : मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केले होते, त्या पॅकेजला खेकड्याने भोकं पाडली का? जशी धरणाला भोके पाडली होती, असा सवाल करत नाव न घेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेमाजी मंत्री व शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. Tanaji Sawant
धाराशिवच्या दौऱ्यावर असताना बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. उद्योगपती मित्रांची कर्ज माफ होतात, ते परदेशात असतात. शेतकरी देह सोडतोय पण देश नाही. Tanaji Sawant
उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या वेळी चुकून मंत्री केले होते. पीक विम्याचे पैसे वेळेत दिले नाही, तर तुमच्या ऑफिसमध्ये शेतकरी घुसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा तानाजी सावंत यांना दिला आहे. तसेच शेतकरी कर्ज माफी केली नाही, तर पवार नाव लावणार नाही, असे अजित पवार म्हणाले होते, आता का नाव लावता? असा सवाल देखील ठाकरेंनी अजित पवारांना केला. शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे पैसे द्या, शेतकरी भिकारी नाही, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. “दगाबाज रे” संवाद दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. 5, 6, 7 व 8 नोव्हेंबर रोजी असे 4 दिवस ते मराठवाडयातील शेतकऱ्यांशी थेट गावातील पारावर व बांधावर जाऊन राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीची भरपाई प्रत्यक्षात मिळाली की नाही याची माहिती घेणार आहे.
जूनमध्ये कर्जमाफी जाहीर केली आहे म्हणजे कोपराला गूळ लावणे आहे. सरकार दगाबाज असेल तर त्यांच्याशी दगाच केला पाहिजे. त्यांना सांगा आधी कर्जमुक्ती द्या, मग आम्ही तुम्हाला मतं देऊ. माझ्याकडे देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ आहे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा, आता कुठे गेलास रे चोरा? असे म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
Did the Crab Puncture CM’s Announced Package? Uddhav Thackeray Slams Tanaji Sawant
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















