विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Jarange Lashes Out at Bhujbal : मराठा आरक्षण आंदाेलनात सरकारने हैद्राबाद गॅझेटियर लागू करण्याची मागणी मान्य केल्याने मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरून मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी भुजबळांवर जाेरदार निशाणा साधला आहे.
आता आम्हीही ओबीसीच आहोत ना… मग आम्हाला कशाला धक्का लावतो? का तूच खातो सगळं रेटून? असा सवाल त्यांनी केला.
मनाेज जरांगे छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. ओबीसी भाजपचा डीएनए आहे. या डीएनएला धक्का लागायला नको. याची काळजी भाजपने घ्यायला हवी? असे भुजबळ म्हणाले हाेते. यावर जरांगे म्हणाले, “कुठे लागलाय मग? आम्हीही ओबीसच आहोत. ओबीसीच्या डीएनएला धक्का लागायला नको ना…? मग आता आम्हीही ओबीसीच आहोत ना… मग आम्हाला कशाला धक्का लावतो? का तूच खातो सगळं रेटून?
जरांगे म्हणाले,जीआर निघाल्यानंतरच फार अभ्यासक झाले जीआरच्या आधी काही सापडत नव्हतं. पण ठीक आहे ना, भावना आहेत, समाजाचे लोक आहोत, त्यांची भावना आहे ना. काय गरज आहे त्यांना विरोध करण्याची? त्यांना विरोध करायचा असेल, तर करू द्या ना… आम्ही नाही करत त्यांना विरोध. त्यात काय सुधारणा करायची सांगितली आहे.
जरांगे म्हणले, जीआरमध्ये मला ज्या गोष्टीवर आक्षेप वाटला, ते मी काढून टाकले. त्यातले दोन शब्द आणि खालच्या भागातील 4 शब्द. मी जागेवरच सांगिलले की, हे योग्य नाही. मी जीआरला हात लावणार नाही. त्यावर ते म्हणाले पुन्हा वेळ द्यावा लागेल. मी म्हणालो वेळ घ्या नाही तर काही करा. मी लोकांनाही सांगितले, जोवर जीआर हातात येत नाही, तोवर उपोषण सोडायचे नाही. त्यावर पुन्हा दीड तास गेला. ते दोन शब्द काढले, पुन्हा चार आले. यावर, तेथे बसलेल्या अभ्यासकांनी आक्षेप घेतला. यानंतर त्यांनी थोडं समजून सांगितल्यानंतर, आम्ही म्हणालो ओके. असेलच काही तर दुरुस्त करायचे म्हणालो ना राव. आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो.
Do You Alone Devour Everything?” Jarange Lashes Out at Bhujbal
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा