विशेष प्रतिनिधी
मुंबई : करमाळ्यात ऑफिसर आपले काम करत होत्या, तर इतरांच्या सांगण्यावरून त्यांना कॉल करून धमकी देणे एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? माहिती तरी घेतली का अजित पवारांनी? असा सवाल करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांनी संबंधीत महिला आयपीएस अधिकाऱ्याची माफी मागावी अशी मागणी केली आहे. Anjali Damania
मुरूमाचं अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करायला गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना अजित पवारांनी दम दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून याबाबत अंजली दमानियांनी संताप व्यक्त केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात अवैध मुरू उत्खनन सुरू असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि तलाठी गेले होते. पण, काही लोक काठ्या घेऊन आले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी करण्यास सुरूवात केली. माहिती मिळताच करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा या पथकासह तिथे गेल्या. त्यानंतर अजित पवारांनी त्यांना कारवाई थांबवा म्हणून सांगितले. Anjali Damania
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, तुझे डेरिंग कसे झाले…. असे त्या बाईंना अजित पवार म्हणाले? इतकी दादागिरी? ह्या बद्दल अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे.
अवैध उत्खनन करणाऱ्यांनीच केला अजित पवारांना कॉलअंजली कृष्णा या कारवाई करण्यासाठी पोहोचल्यानंतर मुरुमाचे अवैध उत्खनन करणााऱ्यांनी अजित पवारांना कॉल केला होता. कार्यकर्त्याने कॉल स्पीकरवर टाकून अंजली कृष्णा यांच्याकडे दिला होता. अजित पवारांनी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले, त्यावर अंजली कृष्णा म्हणाल्या की, माझ्या मोबाईलवर कॉल करा. त्यानंतर अजित पवार संतापले. तुमच्यावर कारवाई करून असा दमही अजित पवारांनी दिला. Anjali Damania
Does Threatening Suit a Deputy CM? Anjali Damania Demands Apology from Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा