New York mayoral election : न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक झोहरान ममदानी यांचा दणदणीत विजय

New York mayoral election : न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक झोहरान ममदानी यांचा दणदणीत विजय

New York mayoral election

विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : New York mayoral election अमेरिकन राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तीव्र विरोधानंतरही भारतीय वंशाचे गुजराती मुस्लिम झोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत ( New York mayoral election) जोरदार विजय मिळवला आहे. झोहरान हे गेल्या 100 वर्षांतील पहिले भारतीय-अमेरिकन आणि मुस्लिम महापौर ठरले आहेत. त्यांच्या विजयाने अमेरिकेतील भारतीय समुदायात अभिमानाची लाट पसरली आहे. New York mayoral election



ममदानी यांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली. 9.48 लाख लोकांनी मतदान केले. न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर आणि अपक्ष उमेदवार अँड्र्यू कुओमो 41 टक्के म्हणजेच अंदाजे 7.76 लाख मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आले. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कर्टिस स्लिवा 7.3 टक्के म्हणजेच अंदाजे 1.37 लाख मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आले. गेल्या 100 वर्षातील ममदानी हे सर्वात तरुण, पहिले भारतीय-अमेरिकन आणि पहिले मुस्लिम महापौर असतील. New York mayoral election

राजकारणात येण्यापूर्वी ममदानी हे हिप-हॉप रॅपर होते. त्यांचे सर्वात प्रसिद्ध गाणे “कांडा” युगांडामध्ये व्हायरल झाले होते. त्यात युगांडाची राजधानी कंपालामध्ये तरुणांसमोरील जीवन आणि आव्हानांचे चित्रण होते. ममदानी म्हणतात, संगीताच्या माध्यमातून त्यांना प्रथम समाजातील असमानता आणि ओळखीच्या राजकारणाविरुद्ध आवाज उठवण्याची गरज जाणवली. महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर, ममदानी क्वीन्समध्ये गेले. तेथे त्यांनी इमिग्रंट, रेंटर्स आणि ब्लॅक लाईव्ह्स मॅटर चळवळीसारख्या चळवळींमध्ये भाग घेतला. या काळात, ममदानीने 2017 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षासोबत त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2020 मध्ये, ते न्यू यॉर्क राज्य विधानसभेत निवडून आले आणि 2022 आणि 2024 मध्ये बिनविरोध विजयी झाले. त्यांच्या कार्यकाळात, ममदानी यांनी सामान्य माणसावर थेट परिणाम करणारे मुद्दे उपस्थित केले, ज्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

http://youtube.com/post/UgkxBNY_oBZixExRhkmIG2ulJC6UUFB9_BDl?si=4guh6P0pwMbXQueo

झोहरान ममदानी हे मूळचे गुजरातमधील असून त्यांचे वडील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ महमूद ममदानी आणि आई मिरियम ताजुद्दीन या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेतले असून, काही वर्षांपूर्वी ते न्यूयॉर्क असेंब्लीचे सदस्य म्हणून निवडून आले होते. सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य आणि परवडणारी घरे या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे.

या निवडणुकीत ममदानी यांनी “People Before Profit” या घोषवाक्यासह प्रचार केला. त्यांनी स्थानिक कर प्रणालीत सुधारणा, सार्वजनिक वाहतूक स्वस्त करणे, तसेच घरभाडे नियंत्रण धोरण मजबूत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या निवडणूक अजेंड्याचा केंद्रबिंदू सामान्य नागरिकांचे प्रश्न आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित मुद्दे होते.

दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प आणि रिपब्लिकन नेत्यांनी ममदानींवर “वाममार्गी विचारसरणीचा” आरोप करत तीव्र प्रचार मोहीम राबवली होती. मुस्लिम आणि स्थलांतरितांवर केंद्रित नकारात्मक प्रचार झाला, परंतु झोहरान यांनी त्याला थेट उत्तर देत “मी न्यूयॉर्कचा आहे, आणि या शहराचे भवितव्य विविधतेत आहे” असे सांगितले.

निवडणुकीनंतर भाषणात त्यांनी म्हटले, “हा विजय माझा नाही, तर या शहरात मेहनत करणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या प्रत्येक न्यूयॉर्ककराचा आहे. आम्ही असे शहर घडवणार आहोत जिथे धर्म, वर्ण किंवा उत्पन्न यावरून भेदभाव होणार नाही.”

Donald Trump’s staunch opponent Zohran Mamdani wins New York mayoral election in landslide

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023