विशेष प्रतिनिधि
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचा जीआर आल्यापासून सर्वत्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. काही नेते या जीआरला पाठिंबा देताना दिसत आहेत, तर दुसरीकडे काही नेते हा जीआर म्हणजे संविधानाशी केलेला फ्रॉड असल्याचं म्हणत आहेत. याच संदर्भात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडले आहे. Gunaratna Sadavarte
दरम्यान, या जीआर विरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी एका दिवसासाठी मंत्रिमंडळाचा त्याग केला आहे. ‘भुजबळांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो’, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे. तसेच, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने जो शासन निर्णय काढण्याचं धाडस दाखवल तो संविधानशी केलेला फ्रॉड आहे. या निर्णयाविरोधात भुजबळांनी लोकतांत्रिक पद्धतीने विरोध दर्शवून सांविधानिक गांभीर्य दाखवलं आहे, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
कुणबी याचा अर्थ शेती करणारा असा होतो. यानुसार जे ओबीसी किंवा ब्राह्मण समाजातील लोकं शेती करतात त्यांनाही आरक्षण मिळणार का? असा सवाल वकील गुणरत्न सदवार्ते यांनी केला आहे. सोबतच सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी देखील ‘जरांगे हे केवळ स्वतःच्या फायद्यासाठी मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचं’ म्हटलं आहे. सरसकट सगळ्या मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणे शक्य नाही, असंही त्या यावेळी म्हटल्या. Gunaratna Sadavarte
मुख्यमंत्री ब्राम्हण समाजाचे आहेत म्हणून त्यांना घेरु नये !
गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या पत्रकार परिषदेत ‘मुख्यमंत्री हे केवळ ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करू नये’, असं स्पष्टपणे सांगितलं. सोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संबंधित जीआर परत घेण्याची विनंती केली आहे. सदावर्ते यांनी ‘या जीआर मुळे मराठा बांधवांना कोणताच फायदा होणार नाही. याउलट केवळ दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल’, असं मत व्यक्त केलं. Gunaratna Sadavarte
हा जीआर एक फ्रॉड आहे, कारण संविधानानुसार अश्या कोणत्याही प्रकारची तरतूद करता येऊ शकत नाही. हा निर्णय सांविधानिक नाही तर पाटिलकी सारखा वाटत आहे. त्याच प्रकारे जर सरकार केवळ एखाद्या समाजाच्या आधारावर आरक्षण देत असेल तर माझ्या इतर समाजातील मागासवर्गीय बांधवांवर हा अन्याय नाही का? असा सवाल सदवार्ते यांनी केला आहे.
त्यांनी सांगितलं की, या आधीही न्यायालयात हे सिद्ध झालेले आहे की कुणबी आणि मराठा या दोन वेगळ्या जाती आहेत. त्यामुळे जबरदस्तीने मराठा बांधवांना कुणबी म्हणून आरक्षण देता येऊ शकत नाही. हा सगळा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणाचा भाग असल्याचा गंभीर आरोप देखील सदावर्ते यांनी केला आहे. त्यामुळे सरकारने आजच्या बैठकीत हा जीआर लवकरात लवकर मागे घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. Gunaratna Sadavarte
Don’t target the Chief Minister just because he belongs to the Brahmin community; Gunaratna Sadavarte’s warning
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल