विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिचा घरी होत असलेल्या सातत्यपूर्ण छळप्रकरणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाला तातडीच्या कारवाईसाठी निवेदन सादर केले असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित सुप्रसिद्ध अभिनेत्रीने (Tanushree Dutta) अलीकडील सोशल मीडियावरील व्हिडीओमधून तिला तिच्या स्वतःच्या घरात छळ सहन करावा लागत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. २०२० पासून अभिनेत्रीच्या निवासस्थानी दरवाजे आपटणे, मोठ्या आवाजात आरडाओरडा करणे असे त्रासदायक वर्तन होत असल्याचे तिने सांगितले आहे. याशिवाय, चोरीच्या घटना, पिण्याच्या पाण्यात छेडछाड झाल्याचा संशय आणि घरगुती मदतनीसांचा छळासाठी वापर केला जात असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी या तक्रारींची गंभीरता व संबंधित अभिनेत्रीची बिघडती तब्येत लक्षात घेऊन महिला आयोगाने तातडीने चौकशी सुरू करावी आणि संबंधित स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय साधून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या शारीरिक व मानसिक सुरक्षिततेची हमी देणे, एफ.आय.आर. नोंदविण्यासाठी आवश्यक कायदेशीर व मानसोपचार सहाय्य उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
“सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा सन्मान व सुरक्षितता तातडीने आणि काळजीपूर्वक जपली जाणे आवश्यक आहे,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निवेदनात म्हटले असून, महिला आयोगाने या प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
अभिनेत्रीनं तनुश्री दत्तानं दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. नाना पाटेकर आणि बॉलिवूडची माफिया गँग मिळून मला त्रास देत आहे. मी कुणाचं नाव तर घेत नाही, पण या सर्व गोष्टी माझ्यासोबत 2018 नंतर पासूनच सुरू झाल्या. 2018 आधी माझा कधीच अपघात नव्हता झालेला, माझा कुणीतरी पाठलाग करतोय, असा विचारही कधी केला नव्हता. प्रत्येकजण त्याचं कनेक्शन 2018 च्या माझ्या आरोपांशी जोडतोय… नाना पाटेकर हा एकटा नाहीये, बॉलिवूडमधली माफिया गँग आहे, जी या सगळ्या काळ्या करतुदींमध्ये सहभागी आहे… त्यांना माझा प्रॉब्लेम असेलच ना… माफिया गँगमध्ये कोण-कोण आहे, हे मी सांगू शकत नाही.
Dr. Neelam Gorhe demands that the National Commission for Women should take cognizance of the harassment case against actress Tanushree Dutta
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला