Yashwant Sawant : गाेव्यातील भूमाफिया यशवंत सावंतवर ईडीचे छापे, आलिशान गाड्या जप्त

Yashwant Sawant : गाेव्यातील भूमाफिया यशवंत सावंतवर ईडीचे छापे, आलिशान गाड्या जप्त

Yashwant Sawant

विशेष प्रतिनिधी

पणजी :  Yashwant Sawant गाेव्यातील हणजूण आणि आसगाव येथील भूमाफिया यशवंत सावंत आणि इतरांच्या गोवा, हैदराबाद येथील १२ ठिकाणांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. या छापेमारीत ७२ लाखांची रोकड आणि काही आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. सुमारे १२०० कोटी रुपयांचा घाेटाळ्याप्रकरणी यशवंत सावंत संशियत असून त्याच्या ३.५ लाख चौरस मीटरहून अधिक जमीन बळकावल्याचा आरोप आहे. Yashwant Sawant



ईडीने केलेल्या कारवाईत रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू यासारख्या ७ आलिशान कार जप्त करून काही बँक खातीही गोठवली आहेत. ईडीने केलेल्या कारवाई एक बांधकाम व्यावसायिक व सावंत यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. छापेमारी सुरू असल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. गोव्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित संशयितांच्या हैदराबाद येथील ठिकाणांवरही छापेमारी करून महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कम तसेच आलिशान कार जप्त केल्या आहेत. याशिवाय संशयितांची बँक खातीही गोठवल्याची कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील भू-बळकाव प्रकरणाचा तपास हा गोवा पोलिसांचे एसआयटी पथक करीत आहे. Yashwant Sawant

ईडीकडून मनी लाँड्रिंगच्या दिशेने तपास केला जात आहे. ३.५ लाख चौरस मीटरहून अधिक जमीन बळकावल्याचा आरोप संशयितांवर असून या घोटाळ्याची व्याप्ती १२०० कोटी रुपये इतकी असल्याचे म्हटले जात आहे. ईडीकडून पुढेही या प्रकरणी कारवाई सुरूच राहिली, अशी माहिती सुत्रांनी दिली.दरम्यान, ईडीकडून ९ आणि १० सप्टेंबर २०२५ ला सलग २ दिवस सर्च ऑपरेशन करण्यात आले. जमिनीवर अवैध कब्जा केल्याचे हे प्रकरण आहे. बनावट कागदपत्रे वापरून हजारो एकर जमीन हस्तांतरित करण्यात आली होती. आरोपींनी जी जमीन हडपली त्याची बाजार भावानुसार किंमत १२०० कोटीहून अधिक आहे. Yashwant Sawant

ED raids on Goa land mafia Yashwant Sawant, luxury cars seized

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023