विशेष प्रतिनिधी
जळगाव : स्वतःच्या प्रॉपर्टीची चौकशी लावा, माझ्या मुलाची मृत्यूची सीआयडी चौकशी करा आणि प्रफुल्ल लोढा याची नार्को टेस्ट करा, अशी तीन आव्हाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. Eknath Khadse
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पलटवार करत एकनाथ खडसे म्हणाले की, ‘त्यांनी माझे चॅनेल स्विकारावे. यामध्ये त्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी, माझ्या मुलाच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी आणि प्रफुल्ल लोढा याने महाजन यांच्यावर केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्याची नार्को टेस्ट करावी.
महाजन यांनी जिल्ह्यात कोणते मोठे विकासाचे काम केले? असा प्रश्न करत खडसे म्हणाले , महाजन हे केवळ अर्ध्या खात्याचे मंत्री आहे. महाजन यांच्या हिंमत असेल तर त्यांनी केलेल्या मोठ्या विकास कामाचे एकतरी उदाहरण दाखवावे? जिल्ह्यात झालेली सर्व धरणे ही माझ्या कार्यकाळात पूर्ण झाली.
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादात मंगेश चव्हाण यांनी देखील उडी घेतली होती. एकनाथ खडसे यांचे अनेक महिलांशी संबंध होते, असा आरोप चव्हाण यांनी केला होता. त्यावर देखील खडसे यांनी पलटवार केला आहे. मंगेश चव्हाण यांनी माझ्या चारित्र्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे चव्हाण यांनी पुरावा दाखवावा. त्यांनी एक जरी पुरावा दाखवला तर मी राजकारणातून निवृत्ती घेईल.
Get your own property investigated, get Prafulla Lodha’s narco test done, Eknath Khadse challenges Girish Mahajan
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी दुसरे आंबेडकर होऊ शकतात ! उदित राज यांच्या विधानावरून संताप
- नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ थेट जनतेशी थेट संवाद साधणार
- अजित पवार यांच्यावर पूर्ण विश्वास, कोकाटे यांनी फेटाळली राजीनाम्याची चर्चा
- मंत्र्यांचा राजीनामा, संजय शिरसाट म्हणाले सामनामध्ये बातमी आली याचा अर्थ कधीच होणार नाही!