विशेष प्रतिनिधी
पुणे : संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील स्वभावाचे उदाहरण घालून दिले आहे. Eknath Shinde
संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे कळताच शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना कर्ज फेडण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. रविवारी एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस होता. मात्र, देहू मध्ये दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये कोणीही वाढदिवस साजरा करू नये अशा स्पष्ट सूचना देऊन शिंदे यांनी आमदार विजय शिवतारे यांना मोरे महाराज यांच्या घरी पाठवून ही मदत दिली आहे.
ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चार चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. आपल्यावर ३२ लाखांचे कर्ज झाल्याचे त्यांनी नमूद केले होते. तसेच माझ्यावर झालेले कर्ज सर्वांनी मिळून फेडावे, असे आवाहनही त्यांनी आपल्या मित्र परिवाराला केले होते. ही गोष्ट समजल्यावर एकनाथ शिंदे यांनी शिरीष महाराज मोरे यांच्यावर किती कर्ज आहे, कशाचे कर्ज आहे याची माहिती घेतली.
आमदार विजय शिवतारे यांच्याशी संपर्क साधून मोरे यांचे कर्ज फेडण्यासाठी आर्थिक मदत करण्याची सूचना केली. त्यानुसार, आमदार शिवतारे यांनी रविवारी देहू येथील मोरे यांच्या घरी जात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा निरोप देत त्यांना आर्थिक मदतीचा धनादेश दिला.
कर्ज फिटेल एवढी त्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराज यांच्या अकाली जाण्यामुळे पिंपरी चिंचवड मध्ये कोणीही माझा वाढदिवस साजरा करू नये अशा स्पष्ट सूचना शिंदे यांनी दोन दिवस आधीच सर्वांना दिल्या होत्या.
Eknath Shinde’s helping hand to the More Maharaj family
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन




















