विशेष प्रतिनिधी
मुंबई : सीपी राधाकृष्णन हे जरी मुळचे तामिळनाडूचे असले तरी महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. महाराष्ट्राचे मतदार देखील आहे. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रात मतदान केलं आहे. मतदार यादीत त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील माणसाला सर्वांनी समर्थन द्यावं, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना केले . CP Radhakrishnan
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याची 21 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. यासंदर्भात रविवारी भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जेपी नड्डा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. यानंतर राज्यपाल सीपी राधाकृष्णन आज (18 ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीसाठी रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार यांनी त्यांची विमानतळावर भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून एनडीएने घोषित केलं आहे. ही आपल्या सगळ्याकरता आनंदाची गोष्ट आहे. CP Radhakrishnan
सीपी राधाकृष्णन हे जरी मुळचे तामिळनाडूचे असले तरी महाराष्ट्राचे राज्यपाल देखील आहे. महाराष्ट्राचे मतदार देखील आहे. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रात मतदान केलं आहे. मतदार यादीत त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आहे. ते उपराष्ट्रपतीपदाचा ते जो फॉर्म भरणार आहेत, त्या फॉर्ममध्ये त्यांना ते कुठले मतदार आहेत, याचा पुरावा लावावा लागतो. त्यामुळे ते महाराष्ट्राचे मतदार म्हणून त्याठिकाणी पुरावा लावणार आहेत. म्हणून महाराष्ट्राकरता ही विशेष आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विमानतळावर सोडण्याकरता गेलो होतो.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रातला माणूस उपराष्ट्रपती होतो आहे, त्यामुळे माझी अपेक्षा की, महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी त्यांना मतदान केलं पाहिजे. महाराष्ट्राची अस्मिता सांगणारे जे पक्ष आहेत, मग शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल, या पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी सीपी राधाकृष्णन यांना समर्थन दिलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातला एक मतदार हा उपराष्ट्रपती होतो आहे, त्याकरता सर्वांनी त्यांना मदत केली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Everyone should support the people of Maharashtra CP Radhakrishnan, Devendra Fadnavis appeals to Maha Vikas Aghadi
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला