विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (HSRP) प्लेट्स बसवण्यासाठीची परिवहन अंतिम मुदत विभागाकडून वाढवण्यात आली आहे. अंतिम मुदत 15 ऑगस्ट, 2025 रोजी समाप्त होणार होती. HSRP
मात्र राज्यातील सुमारे 70% जुन्या वाहनांवर (HSRP) प्लेट्स अजूनही बसवण्यात आलेल्या नाहीत. यामुळे मुदतीत देऊनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना 10 हजार पर्यंतचा दंड आकारला जाण्याची शक्यता असल्याने मुदत वाढवण्याची मागणी केली जात होती. या नंबरप्लेट बसवण्यासाठी काही तांत्रिक अडचणींमुळे तसेच अवघड स्वरुपाच्या प्रक्रियेमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता राज्यातील वाहनधारकांना सरकारकडून मोठा दिलासा भेटला आहे.
2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट, म्हणजेच HSRP बंधनकारक करण्यात आली आहे. केंद्र सरकारने यासाठी सुरुवातीला सुरुवातीला 30 जून 2025 मुदत दिली होती. त्यानंतर ही मुदत 15 ऑगस्ट 2025 म्हणजेच उद्या अशी दिली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे तसेच अवघड स्वरुपाच्या प्रक्रियेमुळे वाहनधारकांचा प्रतिसाद कमी असून, अजूनही मोठ्या प्रमाणावर वाहनांची नोंदणी बाकी आहे. त्यामुळे सरकारकडून आता 30 नोव्हेंबर 2025 ही तारीख अंतिम मुदतवाढ म्हणून घोषीत करण्यात आली आहे.
राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठीची अंतिम मुदत १५ ऑगस्ट, २०२५ रोजी संपत आहे. ज्या वाहनांवर ही नंबरप्लेट बसवणे गरजेचे आहे त्यांची संख्या अजूनही मोठी आहे. त्यामुळे वाहनचालकांवर १० हजार रुपयांचा भुर्दंड न देता, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसविण्यासाठी मुदतवाढ द्यावी, ही विनंती करतो. वाहनधारकांना HSRP नंबरप्लेट बसविण्याची इच्छा असली तरी तांत्रिक अडचणींमुळे आणि किचकट प्रक्रियेमुळे त्या बसविण्यात त्यांना अडचणी येत आहेत. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे ७०% जुन्या वाहनांवर HSRP प्लेट्स अजूनही बसवलेल्या नाहीत. त्यामुळे
वाहनांची एचएसआरपी नंबर प्लेट ही एक विशेष प्रकारची हाय सिक्युरिटी प्लेट आहे. क्रोमियम-आधारित होलोग्राम या प्लेटमध्ये असल्याने अनेक प्रकारची होणारी छेडछाड थांबवण्यासाठी वाढीव सुरक्षा मिळते. यामध्ये 10 अंकी पिन कोड असतो, जो वाहनांचा युनिक कोड असतो. HSRP प्लेट्स स्टीलच्या बनवलेल्या असतात आणि त्यांच्यावर लेसर-प्रिंट केलेले क्रमांक असतात, ज्यामुळे त्यांची कॉपी करणे कठीण असते. एकदा ही प्लेट लावल्यानंतर गुन्हेगारांना नंबर प्लेट बदलण्याची संधी मिळणे कठीण होते.
HSRP नंबर प्लेट बदलायची असेल तर ती तोडण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे वाहन चोरीला जाण्याची शक्यता कमी असते. या प्लेटवर लिहिलेल्या नोंदणी क्रमांकात कोणताही बदल करता येत नाही. कोडिंग सिस्टममुळे स्कॅनिंग केल्यानंतर लगेचच वाहनाशी संबंधित माहिती उपलब्ध होते. नंबर प्लेट हाय रिझोल्यूशन कॅमेऱ्यांच्या नजरेत लगेचच येते. क्यूआर कोडमधून डेटा वाचणे सोपे असल्याने. अपघात झाल्यास, वाहन मालकाची संपूर्ण माहिती क्यूआर कोडद्वारे काही सेकंदात उपलब्ध होते.
https://youtu.be/yEM_M0BrZwo
Extension of deadline for installation of HSRP
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला