विशेष प्रतिनिधी
मोहोळ : राज्यात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीची बिनविरोध झालेली निवडणूक गाजली. थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पंगा घेतला. यामुळे माजी आमदार राजन पाटील चर्चेत आले. राजन पाटील यांची दिल्लीपासून अमेरिकेपर्यंत चर्चा आहे, अशा शब्दांत सोलापूरचे पालकमंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांनी राजन पाटील यांचे कौतुक केले.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मोहोळ नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार शीतल क्षीरसागर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, अमेरिकेतले लोकही म्हणतात, अनगर कोठे आहे आणि राजन पाटील कोण आहेत? यावर व्यासपीठावर बसलेल्या राजन पाटील यांनी ‘किती शिव्या खातोय’ असं म्हणताच ‘पाटील जे शिव्या खातात तेच मोठे होतात’ असेही गोरे म्हणाले.
राजन पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर अनगर नगर पंचायत निवडणुकीत भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार राजन पाटील यांनी बिनविरोध निवडून आणले. त्यांचे पुत्र बाळराजे यांनी विजयी सभेत बोलताना थेट अजित पवार यांना ललकारले होते.
अजितदादा कोणाचाही नाद करा पण अनगरकरांचा नाद करू नका असा इशारा त्यांनी दिला होता. यावरून मोठा वादही निर्माण झाला होता.जसे तुमचे पार्थ आणि जय तसे समजून बाळराजे यांना माफ करा अशी दिलगिरी राजन पाटील यांनी अजित पवारांकडे व्यक्त केली होती.
From Delhi to the US, Jaykumar Gore’s Praise for Rajan Patil Sparks Buzz
महत्वाच्या बातम्या
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीची धडक बसून नवरा–बायकोसह दोन लहान मुलांचा अपघात
- Uddhav Thackeray : भाजप व संघाकडून मुंबईत भाषिक प्रांतवादाचे विष, उद्धव ठाकरे यांचा आरोप
- Smriti Mandhana : स्मृती मानधना लग्नाच्या तयारीत; सांगलीत सुरू लगबग, टीममेट्सचा व्हायरल डान्स
- Shiv Sena Shinde : शिवसेना शिंदे गटातील किमान 35 आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार, ठाकरे गटाचा दावा



















