महायुती म्हणूनच लढणार पण वेगळे लढलो तर मनभेद नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

महायुती म्हणूनच लढणार पण वेगळे लढलो तर मनभेद नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

Chandrashekhar Bawankule

विशेष प्रतिनिधी

पुणे – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढण्याची कसलीही तयारी भाजप पक्ष करत नाही. या निवडणूका महायुतीमधील १३ ही पक्ष एकत्रितरीत्या महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये वेगळे लढण्याची वेळ आली तर मनभेद होणार नाहीत, याची काळजी घेऊ. भविष्यात महायुती अभेद्य राहील याची काळजी घेऊ, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. या बैठकीसाठी बावनकुळे यांच्यासह इतर मंत्री व पदाधिकारी उपस्थिती होते. माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती कायम ठेवणे, समन्वय साधने, शेतकरी पॅकेजचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल, यासाठी कार्यकर्त्यांनी परीश्रम घेणे यांसह संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढण्याचे आमचे प्रयत्न आहेत. आम्ही स्वबळाची कसलीही तयारी करत नाही. एखाद्या ठिकाणी महायुती नाही झाली. तर मनभेद होतील, अशी टीका मोठा भाऊ म्हणून भाजप नेते करणार नाहीत. समोरून टीका झाली तरी त्याला प्रखर शब्दात उत्तर देले जाणार नाही. महायुतीला धक्का बसेल असे वक्तव्य भाजप नेते व कार्यकर्ते करणार नाहीत. तशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आम्ही महायुतीत मिठाचा खडा टाकणार नाही, राज्यातील महायुती अभेद्यच राहिल, यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असेही बावनकुळे म्हणाले.

पुण्यात माजी आमदार रविंद्र धंगेकर भाजप नेत्यांवर सातत्याने टिका करत असल्याच्या प्रश्नावर बावनकुळे यांनी मी निवडणुकीतील टीकेबद्दल बोलतो, असे म्हणत जास्त बोलणे टाळले.



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५१ टक्के मते घेऊन महायुती विजयी होईल. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकासाची कामे केली जातील, हा विश्वास राज्यातील जनतेला आहे. महायुती ५१ टक्क्यावर आहे, हे विरोधकांचे सर्वे सांगत आहेत. त्यामुळे हारलेल्या मानसिकतेतून स्टंटबाजी करत निवडणूक आयोगाची भेट घेतल आहेत. निवडणुक आयोगाने मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. विरोधकांनी त्यावर काम करणे गरजेचे आहे, जी यादी अडचणीची आहे, त्यावर आक्षेप घेणे गरजेचे आहे. मात्र, ते निवडणुक आयोगाला भेटायला जात आहेत, ही स्टंटबाजी व खोटारडेपणा आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरे हतबल मुख्यमंत्री –

प्रकल्प थांबले तरी चालतील पण दिवाळीत शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी साडेऐकतीस हजार कोटीचे मदतीचे पॅकेज जाहीर केले. हा पिक विमा नाही. विरोधकांचे आरोप चुकीचे आहे, ते राजकारण करत आहेत. उद्धव ठाकरेंना अडीच वर्षात मुख्यमंत्रीपद समजलेच नाही. ते विधानसभेत केवळ दोन वेळा, मंत्रालयात दोन वेळा आले. माझ्या राजकीय कारकीर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. तर देवेंद्र फडणवीस राज्याचे सर्वात सक्षम मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून आल्यानंतर पाकिस्तानचे ध्वज फडकले, त्यामुळे इमतियाज जलिल त्यांना साथ देणारच आहेत, असेही बानकुळे म्हणाले.
गुंड निलेश घायवळला शस्त्र परवाना कुणाच्या सरकारने दिला, पासपोर्टची शिफारस करताना गुन्हे नाहीत, असे कोणाच्या सरकारच्या काळात सांगण्यात आले, हे सर्व पोलिस तपासामध्ये समोर येणारच आहे. आता सरकारचे प्राधान्य उच्च स्तरीय चौकशी करून संबंधीताला जेरबंद करणे, हे आहे. राम शिंदे व घायवळ यांच्या संबंधाबद्दल शिंदे यांनाच विचारावे लागेल, असे म्हणत बावनकुळे यांनी जोपर्यंत न्यायालय शिक्षा देत नाही, तोवर गुन्हेगार कसे समजायचे, असे उत्तर दिले.

परवानाधारक खासगी भूमापकांकडून मोजणी –

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते, तुकडे पडत आहेत. दररोज मोजणीचे २५ -३० प्रस्ताव येतात. खरेदीखत करण्यापूर्वी मोजणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी इतर राज्यानुसार परवानाधारक खासगी भूमापकांकडून मोजणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मोजणीचा अर्ज आल्यानंतर ३० दिवसात मोजणी, नंतर खरेदीखत व फेरफार करता येईल. मोजणी केल्यानंतर आमचे अधिकारी तपासणी करून मंजुरी देतील. यातून राज्यातील शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच पुरंदर विमानतळाच्या ९० टक्के जागेचे भूसंपादन झाले आहे. उर्वरीत भूसंपादन होईल. विमानतळाच्या प्रभावी क्षेत्रात कोठेही घरे, व उंच इमारती होणार नाहीत. जागेचे खरेदी विक्री होणार नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Go Separate Ways: Chandrashekhar Bawankule

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023