गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयावरून नवा वाद. ५०० कोटींचा प्रकल्प ‘नातेवाईकांकडे’ जात असल्याचा दमानियांचा गंभीर आरोप

गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयावरून नवा वाद. ५०० कोटींचा प्रकल्प ‘नातेवाईकांकडे’ जात असल्याचा दमानियांचा गंभीर आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने तब्बल ५०० कोटी खर्च करून उभारलेल्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयावरून राज्यात नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. हे रुग्णालय पीपीपी तत्वावर देण्याच्या प्रस्तावावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी विचारले की, “आता आणखी एक ५०० कोटी रुपयांचे हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांकडे जाणार का?”

शताब्दी रुग्णालय ५८० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय असून बीएमसीनेच ते उभारले आहे. हे रुग्णालय पीपीपी तत्वावर चालवण्यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी निविदा मागवल्या होत्या. तीन बोलीदारांपैकी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची निविदा विशेष चर्चेत आली आहे. तेरणा ट्रस्टचे संस्थापक पद्मसिंह पाटील, हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे सावत्र भाऊ आहेत, तर ट्रस्टचा प्रत्यक्ष कारभार त्यांचे पुत्र आणि भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील पाहतात. त्यामुळे या निविदा प्रक्रियेवर राजकीय प्रभावाचा संशय घेतला जात आहे.



दमानिया यांनी एक्सवर लिहिले शताब्दी हॉस्पिटल विरोध असूनही पीपीपीवर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि योगायोगाने बोली लावणारा तेरणा ट्रस्ट. मुंबईतील सामान्य नागरिकांसाठी बांधलेले रुग्णालय आता पवार कुटुंबाच्या नातेवाईकांकडे जाणार, हे योग्य नाही. बीएमसीच्या पैशातून बांधलेले हे रुग्णालय खासगी हातात देणे म्हणजे सरकारी मालमत्ता निवडकांना बहाल करण्यासारखे आहे.

शताब्दी रुग्णालयाच्या अगदी शेजारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक मोठे खासगी रुग्णालय उभे राहत आहे. अशावेळी बीएमसीचे तयार रुग्णालय राजकीयदृष्ट्या जोडलेल्या ट्रस्टकडे देणे हा “स्पष्ट फायदा पोचवण्याचा प्रयत्न” असल्याचा आरोप दमानियांनी केला.

स्थानिक नागरिक, कर्मचारी संघटना आणि काही माजी नगरसेवकांनी शताब्दी रुग्णालय पीपीपीवर देण्यास जोरदार विरोध केला होता. तरीही महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू ठेवली. आता या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बीएमसीने निविदा प्रक्रिया नियमांनुसार असल्याचा दावा केला आहे. मात्र पारदर्शकता आणि हितसंबंधांचे टाळेबंदी याबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहेत. निविदा रद्द करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Govandi Shatabdi Hospital Row. Damania accuses Ajit Pawar of pushing ₹500 Crore Project to Kin

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023