विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाने विजयाचा गुलाल उधळला असे म्हटले जात असताना मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढणारे विनाेद पाटील यांनी मात्र, शासनाच्या निर्णयाचा काहीही फायदा हाेणार नसल्याचे म्हटले आहे. राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्यासंदर्भात काढलेला शासन निर्णय हा कुणबी प्रमाणपत्र काढण्याविषयीची माहिती पुस्तिका असल्याची टीका मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे. Vinod Patil
पाटील म्हणाले, यापूर्वीही कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी १९६७ पूर्वीच्या पुराव्याची अट होती. ज्याच्याकडे महसुली पुरावा नाही, त्यांच्यासाठी शासनाचे अधिकारी गृह अहवाल तयार करतात. त्यानुसार तपासणी करून प्रमाणपत्र देण्यात येते. त्यामुळे शासनाने उपोषण सोडविण्यासाठी काढलेल्या शासन निर्णयात नवीन काहीच नाही.
केवळ माहिती पुस्तिका दिली आहे. शासनाकडून स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनीही मंत्रिमंडळाची उपसमिती उत्तम काम करीत असल्याचे सांगितले, तसेच ज्यांचे पुरावे आहेत, त्यांनाच प्रमाणपत्र देण्यात येईल. ओबीसींमध्येही कोणालाही सरसकट प्रवेश दिलेला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले. त्यामुळे काढलेल्या शासन निर्णयाचे फलित काय, असा प्रश्नही निर्माणझाला. Vinod Patil
उपोषण सोडविताना त्याठिकाणी उपस्थित असलेल्या अभ्यासकांनी शासन निर्णयावर प्रश्नचिन्ह का उपस्थित केले नाही, असा सवालही पाटील यांनी केला. चर्चेवेळी झोपले होते का? शासन निर्णयावर आता प्रश्न उपस्थित करणारे विनोद पाटील हे आंदोलनाच्या वेळी चर्चा सुरू असताना ‘ताज’मध्ये झोपले होते का? असा टोला मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
त्यावर विनोद पाटील म्हणाले, विखे हे सरकार आहेत. तुम्ही काहीही शिव्या द्यायच्यात त्या द्या. फक्त समाजाला स्पष्ट करा की, शासन निर्णयात तुम्ही समाजाला काय दिले?मराठा समाजातील काही अभ्यासकांच्या दुकानदाऱ्या बंद झाल्यामुळे त्यांना आता पोटशूळ उठला आहे. ते जीआरबाबत चुकीच्या पद्धतीने मांडणी करीत आहेत. Vinod Patil
GR of Maratha reservation is just an information booklet, Vinod Patil criticizes
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा