विशेष प्रतिनिधी
पुणे : Heavy rains भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे, पुणे शहरात रविवारी सायंकाळपासूनच सतत पाऊस पडत आहे. सोमवारी सकाळी देखील अनेक भागात पाऊस पडल्याने आता सखल भागात पाणी साचले आहे. Heavy rains
आयएमडीने आता पुणे जिल्हयासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच घाट भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देखील दिला आहे. पावसाचा जोर लक्षात घेता पुणे तसेच पिंपरी-चिंचवड मधील अनेक खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासनाकडून मात्र याबाबत अजूनही कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
हडपसर, लोणी काळभोर पट्ट्यात ढगफुटीसारख्या पावसाने अनेक घरे आणि वाहने पाण्याखाली गेली. तसेच, पुणे-सोलापूर रस्त्यावर विशेषतः लोणी आणि कदम वाक वस्तीजवळील भागात पाणी साचले होते, ज्यामुळे वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला. इंदापूर आणि बारामती तालुक्यातही अशाच प्रकारच्या पुराची नोंद झाली आहे, जिथे पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये घुसले आहे. Heavy rains
थेऊरमध्ये, जवळजवळ ५० घरे पाण्याखाली गेली, ज्यामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ने बाकाहव कार्य हाती घेतले. पोलीस पथकांनी रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास मदत केली. हे मदतकार्य सकाळपर्यंत सुरू होते. धायरीच्या पश्चिम उपनगरातही अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आहे.
कोणती धरणे १००% भरली?
सतत चालू असणाऱ्या पावसामुळे, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला संकुलतील चारही धरणे आता जवळजवळ भरली आहेत. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत एकत्रित जलसाठा २९.१२ टीएमसी इतका होता, जो एकूण क्षमतेच्या ९९.८९% इतका आहे. गेल्या वर्षीही याच कालावधीत हा साठा ९९.९४% इतका होता.
यामध्ये खडकवासला धरणात ९८.४०% इतका साठा आहे तर उर्वरित पानशेत, वारसगाव, आणि टेमघर ही धरणं १००% भरली आहेत. Heavy rains
धरणातील साठा हा जवळपास १००% झाल्याने खबरदारी म्हणून मूठ नदी पात्रामध्ये सुरू असणारा १०६११ क्युसेकचा विसर्ग वाढवून सकाळी १० वाजता १४५४७ क्युसेक इतका करण्यात आला आहे. परंतु यामुळे आता पुन्हा एकदा भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान अनेक ठिकाणी पाणी साचून पुर परिस्थिति निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी झाडे कोसळण्यासारख्या घटना देखील घडल्या आहेत. अग्निशमन दलाने सकाळी ९ वाजेपर्यंत झाडे कोसळण्याबाबत १० कॉल आल्याची पुष्टी केली आहे.
येत्या काही दिवसातही मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नागरिकांना विशेषतः नदी काठच्या भागात किंवा डोंगराळ भागात राहत असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. Heavy rains
Heavy rains lashed Pune; Dams overflowed, orange alert issued
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा