विशेष प्रतिनिधी
मुंबई: मी तुमच्यासारखे मुख्यमंत्र्यांच्या मागे फिरत नाही. कुठेही लोटांगण घालत नाही. देवा भाऊचे पाय मी चाटत नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली. Eknath Khadse
भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात प्रफुल्ल लोढा याच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहे. गिरीश महाजन यांनी आज सकाळी प्रफुल्ल लोढा आणि एकनाथ खडसे यांच्या सोबतचे दोन फोटो पोस्ट करून दोघांमध्ये गुलाबी गप्पा रंगल्याचा दावा केला होता. Eknath Khadse
एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधत गिरीश महाजनांनी पोस्ट केलेल्या फोटोवर भाष्य करता त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, गिरीश महाजन यांनी माझा जो फोटो ट्विट केला आहे तो बोलका फोटो नाही. बोलका फोटो ट्विट करा, जे मी केले ते करा. या गुलाबी गोष्टी कोणासोबत केल्या, यासंदर्भात मीही तुमचे अनेक फोटो देऊ शकतो. योग्य वेळ येऊ द्या.
एकनाथ खडसे म्हणाले, महाजन म्हणताय की, तुम्ही दिल्ली दरबारी लोटांगण घालता. पण मी तुमच्यासारखे मुख्यमंत्र्यांच्या मागे फिरत नाही. कुठेही लोटांगण घालत नाही. देवा भाऊचे पाय मी चाटत नाही. मी 40 वर्ष रक्ताचे पाणी करुन भाजप पक्ष वाढवला. पण गिरीश महाजन यांच्या वादामुळे मला भाजपातून बाहेर जावे लागले. हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे,
गिरीश महाजन यांनी पोस्ट शेअर करत खडसे यांच्यावर पलटवार केला. यामध्ये महाजन यांनी म्हटले की, ‘एकनाथ खडसे… तुमच्या या “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय…हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात? हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे…
२०१९ ते २०२२ च्या दरम्यान अशा खोट्या पुराव्यांचा आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली, अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. याबद्दल सविस्तर बोलेलच… आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय? एकनाथ खडसे… काय तुझी हि व्यथा…!’