Sanjay Raut : कामाख्याला रेडे कापून आले, कारवाई करायची असेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांवर करा, संजय राऊत यांची मागणी

Sanjay Raut : कामाख्याला रेडे कापून आले, कारवाई करायची असेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांवर करा, संजय राऊत यांची मागणी

Sanjay Raut

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sanjay Raut एकनाथ शिंदे आणि 40 आमदार कामाख्य देवीला जाऊन रेडे कापून आले. सत्तेवर बसले. काही विषय श्रद्धेचे, काही विषय अंधश्रद्धेचे असतात. जादूटोण्यासंदर्भात काही कारवाई करायची असेल तर त्यांच्यावर करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. Sanjay Raut

राऊत म्हणाले, पत्रकारांनी मला प्रश्न विचारला, मुख्यमंत्री वर्षावर का रहायला जात नाहीत?. त्यावर मी माझ्याकडची माहिती त्यांना दिली. मी सुद्धा पत्रकार आहे. लोक मला काही गोष्टी सांगतात. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर रहायला जावं, ते त्यांचं अधिकृत निवासस्थान आहे.



आमचे मुख्यमंत्री जात नाहीयत, ते ताक फुंकून पितायत असं मला दिसत आहे. पण मी त्यांच्या भूमिकेच स्वागत करतो. महाराष्ट्राच मंत्रिमंडळ हा वेड्यांचा बाजार आहे. अंधश्रद्धावाल्यांचा बाजार आहे. मी काय सांगतो हे समजून घ्यायाला शहाणा माणूस हवा, सगळा वेड्यांचा बाजार. आम्ही शिवसेनेचे लोक काय सांगतो, ते त्यांना कधीच कळणार नाही, त्यांच्या डोक्यात गुंगी भरलेली आहे.

संजय राऊत म्हणाले, महाकुंभ आमच्या सगळ्यांसाठी श्रद्धेचा, आस्थेचा धर्माचा विषय आहे. आम्ही सगळेच त्याच्याशी भावनिक नात्याने जोडलेलो आहोत. शिवसेनेचे आमचे अनेक सहकारी कुंभला जाऊन स्नान करुन आले. मी पुढच्या आठवड्यात स्वत: कुंभला जाण्याची योजना आखत आहे. शेवटी दुर्घटना घडली, त्याला कोणीतरी जबाबदार आहे. त्या दिवशी ज्या पद्धतीने चेंगराचेंगरी झाली, याची कारणं काय आहेत आणि नक्की किती श्रद्धाळू तिथे मरण पावले हा माझा प्रश्न होता. सरकारमुळे झालं असं मी म्हणत नाही किंवा विशिष्ट व्यक्ती जबाबदार आहे. आजही तिकडे दोन ते अडीच हजार लोक त्या दिवसापासून बेपत्ता आहेत.

If action has to be taken, take against Eknath Shinde and his 40 MLAs, Sanjay Raut demands

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023