अमरावती : Bachchu Kadu बच्चू कडूने लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आले असते, अशा शब्दांत माजी आमदार बच्चू कडू यांनी आपला संताप व्यक्त केला.Bachchu Kadu
अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात माजी आमदार बच्चू कडू यांनी निवडणुकीतील पराभवावर सांगितले, मी शेतकऱ्यांसाठी बोलत राहणार आहे. पुन्हा एकदा निवडणुकीत पडलो तरीही मला फिकीर नाही.
कडू म्हणाले की, “मी शेतकरी आहे म्हणून बोलतो आहे, कोणालाही त्याचा राग आला तरी चालेल. पण बच्चू कडू त्याची पर्वा करत नाही. मी कधीही लाचारी स्विकारली नाही, तसं केले असते तर कोणाचा पाठिंबा घेऊन मला आमदार होता आले असते. पण ती लाचारी आमच्यात नाही.”
छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामधील वतनदारी बंद केली. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावाल तर कापले जाल असे म्हणणारे राजे आता कोणत्याच पक्षात दिसत नाही. 50 टक्के नफा धरून आम्ही शेतमालाला भाव देऊ असे भाजपने म्हटले होते. काँग्रेसने स्वामीनाथन आयोग लागू करू म्हटले होते. पण, काँग्रेसने सुद्धा लागू केला नाही. पक्ष कोणताही असला तरी तो शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, हे आपण 75 वर्षात पाहिले आहे”, असे म्हणत त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर निशाणा साधला.
महायुतीसोबत राहिलेल्या बच्चू कडू यांनी 2024च्या निवडणुकीत महायुतीची साथ सोडत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी स्वतः बच्चू कडू हे अचलपूर विधानसभेत उभे राहिले आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला. भाजपचे प्रवीण तायडे यांनी त्यांचा पराभव केला.
If I Had Accepted Helplessness, I Would Have Been an MLA: Bachchu Kadu Expresses Anger
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…