विशेष प्रतिनिधी
नाशिक : Chhagan Bhujbal ओबीसी समाजात कोणी शिरकाव करत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांना जालना, आंतरवली सराटी, मुंबई, दिल्ली कुठे आंदोलन करायचे असेल तर त्यांनी ते करावे. मात्र ते नियमात करावे, अशा शब्दांत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी जरांगे यांना ललकारले आहे.Chhagan Bhujbal
मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना आंतरवाली सराटीत आंदोलन करायचे असेल तर तिथे करावे. किंवा मुंबई, दिल्लीत कुठेही करावे. मात्र संविधानाने दिलेले अधिकार आहेत. त्यानुसार नियमात आंदोलन करावे, उपोषण कर, भाषण कर मात्र ते नियमात कर. कोणीही कुरघोडी करू नये.Chhagan Bhujbal
मराठा समाजाला आरक्षण देता आले ते दिले आहे. आणखी काय पाहिजे? इतर कोणत्या समाजाला दिले गेलेले आरक्षण कोणी कमी करत असेल ते सहन करणार नाही. ओबीसी समाजात कोणी शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही असे भुजबळ यांनी ठणकावून सांगितले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत घुसण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनादरम्यान, राज्यात जातीय दंगल पेटवण्याचा डाव असल्याची मला कुणकुण मला लागली आहे. आंदोलनादरम्यान एका पोराला जरी धक्का लागला, तर संपर्णू राज्य बंद पाडू, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि ‘सगेसोयरे’ अध्यादेश लागू करावा, या प्रमुख मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा मोर्चा 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहे. मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
If someone is infiltrating the OBC community, we will not remain silent, Chhagan Bhujbal challenged Jarange
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला