विशेष प्रतिनिधी
जळगाव : युती नाही झाली तर आपण एकमेकांना निवडून आणण्यासाठी थोडंच उभ राहणार आहोत. मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी आम्ही एकमेकांना पाडणारच आहोत. एकमेकांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. Girish Mahajan
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, वरिष्ठ स्तरावरून आदेश आहेत, आम्ही या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहोत. मात्र ज्या ठिकाणी शक्य नसेल अशा काही अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. महायुती मिळून एकत्र लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण काही ठिकाणी जमलं नाही तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आम्ही करू.
उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगरमधील हंबरडा मोर्चावर बोलताना महाजन यांनी, ‘जनावरांसारखा हंबरडा फोडायचा एवढं एकच आता त्यांच्याकडे राहिले आहे असं वाटतं. ज्या दिवसापासून त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्या दिवसापासून त्यांच्या नशिबामध्ये हंबरडाच आहे.
आता समोर निवडणूक आहे त्यामुळे समजेल. दोन महिन्यांनी निवडणुका आहे त्यांचे निकाल देखील येतील, त्यात कोणाचा बँड वाजतो आणि कोणाचा ढोल फुटतो हे कळेलच.
If there is no alliance, we will destroy each other, Girish Mahajan warned
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना