Sanjay Raut : आंदोलने केली नाहीत तर सत्ताधारी माजतील, संजय राऊत यांचा अजित पवारांवर निशाणा

Sanjay Raut : आंदोलने केली नाहीत तर सत्ताधारी माजतील, संजय राऊत यांचा अजित पवारांवर निशाणा

Ajit Pawar, Sanjay Raut

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी आंदोलनावर जी भूमिका मांडली, ती लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाच्या स्थानाला छेद देणारी आहे. विरोधी पक्षाने आंदोलने जर केली नाहीत, तर सत्ताधारी माजतील. राज्य-देश लुटतील. महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्यावर डाके टाकतील. जनतेच्या प्रश्नांना कोणी वाचा फोडणार नाही,” अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.



राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा वर्धापनदिन मंगळवारी पुण्यात झाला यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, “नुसती आंदोलने करून काही होत नाही, सत्तेत राहून लोकांची कामे करावी लागतात,” असे विधान केले. यावरून शिवसेना राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

राऊत म्हणाले की, “ शरद पवारांनी त्यांचा जो पक्ष उभा केला, ते आंदोलनातून उभा केला. शिवसेनेसारखा पक्ष हे एक आंदोलन आहे. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन झाले नसते. अशी अनेक आंदोलने आम्ही केली नसती, तर आज अजित पवार आज या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री किंवा पुढारी झाले नसते.

खासदार संजय राऊत यांनी भाजपसह त्यांच्यासोबत असलेल्या सत्तेतील मित्रपक्षांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, “सत्तेत राहुन लोकांची कामे एकेकाळी करत येत होती. पण आजकाल सत्ता तिजोरी लुटायलाच वापरली जाते. यावर अजित पवारांइतके दुसरे कोणीही भाष्य करू शकणार नाही. गेल्या दहा वर्षांत भाजप आणि त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांनी सत्तेत राहून सर्व क्षेत्रांत असा एकही विभाग नाही की, जिथे लुटमार केली नाही. जनतेचे कोणते प्रश्न मार्गी लावले, हे नरेंद्र मोदींना विचारा.

सत्तेत राहून ज्यांनी मागील काही काळामध्ये प्रचंड लुटमार केली, त्यांच्या चौकशा सुरू झाल्यानंतर ते पुन्हा सत्तेत गेले. जनतेची सेवा करायला गेले, असे कोणी म्हणत असेल, तर ते ढोंग आहे. सत्तेत ते यासाठी गेले की, त्यांना स्वत:ची कातडी, स्वत: वरील कारवाया वाचवायच्या होत्या, अशी टीका राऊत यांनी केली.

If we don’t protest, the ruling party will be loot oeiple, Sanjay Raut targets Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023