Ajit Pawar काम करत राहू, याेग्य वेळी याेग्य निर्णय घेऊ, अजित पवारांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

पुणे : चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने काम करण्यास सुरुवात केली आहे. आम्ही देखील आपले काम करत राहण्याचे ठरवले आहे. योग्य वेळ आल्यानंतर योग्य निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. Ajit Pawar

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बाेलताना पवार म्हणाले, र्धापन दिनाच्या कार्यक्रमात आमचे नेते व मी चर्चा करून योग्य भूमिका मांडू. महायुतीमधील काही सहकारी, कधी एकत्र निवडणुका लढवू तर कधी स्वबळावर निवडणुका लढवू, असे वक्तव्य करत आहेत. मात्र, याचा अंतिम निर्णय प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांना घ्यायचा आहे. मात्र, कुणाचे काय ठरेल, निवडणुका कधी होणार, कोण कुठे जाणार, हे त्या-त्या वेळी सांगितले जाईल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर या दोन्ही पक्षांचे प्रथमच पुण्यात वर्धापन दिनाचे कार्यक्रम होणार आहेत. याबाबत विचारले असता स्वतंत्र वर्धापन दिनावर या दोन्ही पक्षांचा दावा खरा आहे, असे सांगत पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याबाबत मला काही बोलायचे नाही. काय निर्णय घ्यायचे ते त्या-त्या पक्षाचे नेते ठरवतील, अशी प्रतिक्रिया दिली.

उद्धव व राज ठाकरे एकत्र येण्याबाबत ते दोघेच ठरवतील आणि जाहीरही करतील, असे सांगून पक्षाचे समर्थक पाठीराखे हितचिंतक यांना वाटते तसे बोलून दाखवले जाते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची दोन्ही गट एकत्र येतील याबाबतही तसेच सुरू झाले असून, एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारणे तुमचा अधिकार असला, तरी उत्तर देणे माझा अधिकार आहे. आता याबाबत उत्तर द्यायचे नाही, असे मी ठरविले आहे. टीआरपी वाढवण्यासाठी अशा बातम्या दिल्या जातात, असेही ते म्हणाले.

Ajit Pawar made it clear that we will continue to work, we will take the right decision at the right time

महत्वाच्या बातम्या