विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : Laxman Hake सध्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी चळवळीतून बाहेर निघण्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांच्या गाडीवर अहिल्यानगर जिल्ह्यात हल्ला करण्यात आला आहे. काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक व लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. ही घटना घडली त्यावेळी हाके गाडीतच होते. मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे गत काही दिवसांत हाके व त्यांच्या सहकाऱ्यांवरील हल्ले वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
नेमके काय घडले?
लक्ष्मण हाके यांची आज (ता. 27) अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभा होणार होती. या सभेसाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह कारने जात असतांना ते रस्त्यात एकेठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबले. Laxman Hake
तेथून पुढे निघाल्यानंतर त्यांचा ताफा नगर तालुक्यातील अरणगाव लगत पोहोचला असता अज्ञात तरुणांनी त्यांची गाडी रोखून गाडीवर दगड व लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवला. त्यात त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. हा हल्ला झाला तेव्हा लक्ष्मण हाके कारमध्येच होते. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत हल्लेखोर तरुण घटनास्थळावरून पसार झालेले होते. हाके यांच्या सहकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे. Laxman Hake
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गत मंगळवारीच लक्ष्मण हाके यांचे निकटवर्तीय पवन कंवर यांच्यावर बीड जिल्ह्यातील सावरगाव जवळच 30-40 जणांनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला होता. त्यात पवन कंवर गंभीर जखमी देखिल झाले होते.
ही घटना घडली तेव्हा कंवर आपल्या मित्रांसोबत एका हॉटेलवर जेवणासाठी गेले होते. ते तिथे आल्याचे समजताच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तत्पूर्वी, हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची कार जालना शहरात जाळण्यात आली होती. त्यावेळी कारमध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र जालना शहराच्या मध्यवर्ती भागात ही घटना घडल्यामुळे त्याठिकाणी मोठी दहशत पसरली होती. नवनाथ वाघमारे यांनी या घटनेसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांना जबाबदार धरले होते.
विशेष म्हणजे बीडच्या गेवराईत स्वतः लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी दगडफेक केली होती. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते. या घटनेनंतर लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी संरक्षणात शहराबाहेर काढून बीडच्या दिशेने रवाना केले होते. विजयसिंह पंडीत यांनी मात्र घटनेसाठी हाकेंनाच जबाबदार धरले होते. Laxman Hake
लक्ष्मण हाके हे समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तीन-चार दिवसांपूर्वी त्यांनी माझ्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. मी त्यावर कोणतेही भाष्य केले नाही. पण आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रक्षोभक विधानांना प्रतिक्रिया दिली आहे असे ते म्हणाले होते.
यावर लक्ष्मण हाके यांनी आता त्यांची प्रतिक्रिया देखील दिली आहे. ‘आमच्या सोबत पोलिसांच्या गाड्या आणि स्वतः डिपार्टमेंटची लोक असताना देखील ती लोक घाबरली नाहीत. त्यांनी बांबू घेऊन आमच्या गाडीवर हल्ला केला. आम्ही आणखी दहा सेकंद जरी थांबलो असतो तरी ते बांबू आमच्या डोक्यात पडले असते,’ असे हाके यांनी सांगितले. या दरम्यान हाके यांना जरी काही दुखापत झाली नसली तरी त्यांच्या एका सहकार्याला मात्र या हल्ल्यात गंभीर दुखापत झाली आहे. हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गेल्या काही दिवसांपासून असे हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. याविषयी बोलताना हाके यांनी सांगितले की हा त्यांच्यावर झालेला नववा हल्ला आहे. याबाबत त्यांनी सतत सांगुन देखील शासनाला याविषयी कोणतीही चिंता नसल्याचं त्यांनी सांगितलं. Laxman Hake
मात्र हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सतत असे हल्ले होत असून देखील प्रशासन याविषयी कोणतेही ठोस पाउल का उचलत नाही? त्याच बरोबर, या सगळ्या हल्ल्यांमागे नेमका एकच सूत्रधार आहे की हे हल्ले वेगवेगळ्या लोकांनी घडवून आणले आहेत? यांसारखे असंख्य प्रश्न याठिकाणी उपस्थित होतात. Laxman Hake
If we hadn’t left in 10 seconds…’; Laxman Hake recounts the thrill of the attack!
महत्वाच्या बातम्या
- भारतासारख्या हिंदूराष्ट्रात I love Mahadev हेच उद्गार चालणार; नितेश राणेंचा एल्गार
- Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- न्यायालयांनी गंभीर प्रकरणांची दररोज सुनावणी करावी; आरोपपत्र दाखल केल्यानंतर 2 महिन्यांच्या आत बलात्कार प्रकरणांची सुनावणी पूर्ण करा
- Sonam Wangchuk : लेह हिंसाचारासाठी जबाबदार धरत सोनम वांगचुक यांना अटक