विशेष प्रतिनिधी
मुंबई : येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही शेवटची असेल. जर आपण गाफील राहिलो तर ही निवडणूक हातातून गेली म्हणून समजा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. Raj Thackeray
कोकण महोत्सव कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मला आज फक्त एवढी एकच गोष्ट सांगायची आहे की रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे कोणीही गाफील राहू नये. आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवा. आता ज्या प्रकारचे राजकारण सुरू आहे. मुंबईवर ज्या प्रकारे डोळा ठेवला जात आहे, मतदार याद्यांच्या माध्यमातून जे राजकारण सुरू आहे, त्यावर तुम्ही लक्ष ठेवा. Raj Thackeray
राज ठाकरे म्हणाले, आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत आणि कोण मतदार खोटे आहेत? यावर देखील तुमचे लक्ष असणे गरजेचे आहे. मी आज मराठी माणसांसाठी म्हणून एकच गोष्ट सांगतो. येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही शेवटची महापालिकेची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर ही निवडणूक हातातून गेली म्हणून समजा. मग त्यानंतर या लोकांचे जे थैमान सुरू होतील ते मग कोणालाही आवरता येणार नाहीत. त्यामुळे मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे की तुम्ही कुठेही गाफील राहू नका. Raj Thackeray
मनसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी मतदारयादीवरून त्यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला.
दरम्यान, मुंबई महापालिकेमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात युती होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात देखील दोन्ही पक्षात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसने मनसेसोबत युती करण्यास नकार दिला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे मनसेसोबत युती करण्यास सकारात्मक आहेत.
http://youtube.com/post/UgkxwjPNS5N4e1S9wDQpM5N8fvJV85LbzPx4?si=XcA-mdUph3fv11-W
“If We Stay Complacent, This Could Be Mumbai’s Last BMC Election,” Warns Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















