विशेष प्रतिनिधी
मुंबई : Election Commissioner महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यांनी मुंबई महापालिका मुख्यालयात महापालिका निवडणूक पूर्वतयारीबाबत आयोजित बैठकीत आढावा घेतला. या निवडणुकीत येणाऱ्या अडचणींवर योग्य त्या उपाययोजना करून मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि त्यांच्या निवडणूक टीमला दिले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनाने केलेली पूर्वतयारी परिपूर्ण असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. Election Commissioner
मुंबई महापालिकेची निवडणूक गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडली आहे. मात्र निवडणूक आयोग, राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीचे आदेश मुंबई महापालिकेला दिले होते. त्यानुसार, महापालिका आणि निवडणूक यंत्रणा कामाला लागली. मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण मतदार संख्या व मतदान केंद्र, मतदार यादी विभाजन, प्रस्तावित मतदान केंद्रांचे वर्गीकरण, आवश्यक मतदान यंत्रे, मतदान यंत्रे साठवणूक व्यवस्था, निवडणूक साहित्य, मतदान केंद्रावरील सोयी-सुविधा, निवडणुकीसाठी आवश्यक अधिकारी – कर्मचारी वर्ग आदी विविध विषयांचा दिनेश वाघमारे यांनी आढावा घेत महापालिकेने केलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त केले. Election Commissioner
मुंबई महापालिका प्रशासनाने, निवडणुकीसाठी केलेली पूर्वतयारी परिपूर्ण आहे. मतदान केंद्रांवरील सुविधा वाढवून त्याची प्रभावी जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढेल. मागील सार्वत्रिक महापालिका निवडणुकीदरम्यान आलेल्या अडचणींचे निराकरण कशा प्रकारे झाले, याचा विचार करून यंदा अधिक सक्षम उपाययोजना राबवाव्यात. मतदान प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पार पडावी, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत. सर्वांनी पारदर्शक व निर्भयपणे कामकाज करावे. विविध यंत्रणांमध्ये योग्य समन्वय साधून कामकाज सुरळीत व प्रभावीरितीने पूर्ण होईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले. तसेच मागील विधानसभा निवडणुकीत महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अतिउत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांचा गौरव केल्याचा उल्लेख करीत दिनेश वाघमारे यांनी भूषण गगराणी यांचे विशेष अभिनंदन केले. Election Commissioner
Increase the voting percentage, Election Commissioner Dinesh Waghmare instructs the Mumbai Municipal Corporation election team
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा