विशेष प्रतिनिधी
अक्कलकोट : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करुन त्यांच्या तोंडावर काळे फासण्यात आले. अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड गेले असता ही घटना घडली . Praveen Gaikwad
संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला आहे असे कारण देत प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म फाउंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत शाईफेक केली. त्याचसोबत स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान केल्याचा देखील राग कार्यकर्त्यांच्या मनात होता. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते.
प्रवीण गायकवाड यांचा आज अक्कलकोटमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार समारंभ सुरु असताना कार्यक्रम ठिकाणीच त्यांना काळं फासण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. इंदापूरच्या शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ही शाईफेक केल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीचे नेते म्हणून ओळखले जातात. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या प्रवीण गायकवाड यांनी मधल्या काळात शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला होता. मात्र, शेकापमधून बाहेर पडून, ते पुन्हा संभाजी ब्रिगेडचे संघटनात्मक काम करत आहेत.
Ink was thrown at Sambhaji Brigade state president Praveen Gaikwad in Akkalkot.
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार