विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नागरिकाला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
रॉयल ग्रुपचे संचालक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रफुल कोठारी हे त्यांच्या खासगी कामासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कदम यांनी कोठारी यांना अपमानास्पद वागणूक दिली. अशा कामांसाठी सारखे सारखे पन्नास वेळा येऊ नका, इथं परत यायचं नाही, असे म्हणत चिडचिड करण्यास सुरुवात केली.
कोठारी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बावनकुळे यांना मेसेज करून घडलेला प्रकार तक्रारीच्या स्वरुपात कळवला. मंत्री बावनकुळे यांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेत या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी अद्याप कारवाई झालेली नसली तरीदेखील कार्यकर्त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाते हा दिलासा मोठा असल्याचे कोठारी यांनी सांगितले.
Inquiry Ordered Against Deputy Collector for Abusive Conduct by Revenue Minister Chandrashekhar Bawankule
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी