Honey Trap case हनी ट्रॅप प्रकरणात नाशिकच्या बड्या हॉटेलच्या मालकाच्या मालमत्तेची चौकशी

Honey Trap case हनी ट्रॅप प्रकरणात नाशिकच्या बड्या हॉटेलच्या मालकाच्या मालमत्तेची चौकशी

विशेष प्रतिनिधी

नाशिक : हनी ट्रॅप प्रकरणात नाशिकच्या मुंबई नाकाजवळील एका बड्या हॉटेलच्या मालकावर संशय असून त्यानेच या हॉटेलमध्ये येणारे महसूल अधिकारी, आयपीएस, आयएएस आणि आजी-माजी मंत्र्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची चर्चा आहे. या प्रकरणाची चौकशी गोपनीय शाखेने नुकतीच केली. यात संबंधित हॉटेल मालकासोबत अन्य कुणी सहभागी आहे का? याचाही तपास केला जात आहे. त्याचप्रमाणे संबंधित हॉटेल मालकाच्या मालमत्तेचीही चौकशी होत आहे. Honey Trap case

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यात “ना हनी आहे ना ट्रॅप” असे सागंत विरोधकांच्या आरोपांतील हवा काढली असली तरी या “हनी ट्रॅप” प्रकरणाचा केंद्रबिंदू नाशिक असल्याचे बोलले जात असल्याने शहरात या ट्रॅपविषयी आठवडाभर जोरदार चर्चा सुरू आहे. काही अज्ञात व्यक्तींनी शहरात यासंदर्भातील बॅनरही झळकवले आहेत. संबंधित हॉटेल व्यावसायिकाने आजवर केलेल्या कारनाम्यांविषयी देखील चर्वितचर्वण सुरू आहे. यात प्रामुख्याने अशी 6 कथित प्रकरणे आहेत, ज्यामुळे संबंधित हॉटेल व्यावसायिकाचे पाय अधिक खोलात जाऊ शकतात. या प्रकरणी नाशिकमध्ये अद्याप एकही गुन्हा दाखल नसला तरी राजकीय, सामाजिक क्षेत्रात काही चर्चा उघडपणे सुरू असल्याने पोलीस आता या चर्चांमध्ये तथ्य आहे का, याचा शोध घेत आहेत. सध्या तो हॉटेल मालक नाशिक सोडून कुठे कुठे फिरतोय यावर पोलिसांची नजर असून सध्या त्याचे लोकेशन बंगळूरला असून तिथूनच मॅनेज केल्याची चर्चा सुरू आहे.

राज्यातील 72 सनदी आणि प्रशासकीय क्लास वन अधिकारी, आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘आपलं महानगर’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली असून नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. मात्र ‘हनीही नाही आणि ट्रॅपही नाही,’ असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. असे असले तरीही हे प्रकरण थांबायला तयार नाही. रोज नवनवीन खुलासे होत असल्याने लोकांमध्ये कुजबूज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात 2 दिवसांपूर्वी ‘हनी ट्रॅप एन्जॉय प्रकरणातील मान्यवरांची नावे ऐकण्यास नाशिककर उत्सुक आहेत’, असे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर मनोज, अमित आणि समस्त नाशिककर असा उल्लेख आहे. बॅनर लावणारे हे मनसेचे पदाधिकारी असल्याचे कळते. पोलिसांनी बुधवारी हे बॅनर काढून टाकले.

हॉटेल मालकाने मालमत्ता नक्की कशी विकत घेतली याचाही शोध पोलीस घेत आहेत. या हॉटेल मालकावर जवळपास 25 प्रकारचे दिवाणी दावे सुरू असून त्याच्या विरोधात फसवणुकीच्या चार तक्रारीही पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत.

राज्यभरातील हनी ट्रॅपची प्रकरणे नाशिकमध्येच घडल्याचा गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे गोंधळ निर्माण होत आहे. वास्तविक, एका हॉटेल व्यावसायिकाने नाशिकमधीलच एका प्रशासकीय अधिकाऱ्याला अडकवल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अशाच प्रकारची अन्य प्रकरणे झाली असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ठाण्यात एका होमगार्ड महिलेसंदर्भातही हनी ट्रॅपच्या प्रकरणांची चर्चा आहे. मात्र, सदर महिलेने माध्यमांसमोर येऊन तिच्यावर काही पोलीस अधिकाऱ्यांनी कसा अन्याय केला आणि आता या प्रकरणाला हनी ट्रॅपचा खोटा रंग कसा दिला जात आहे, हे कथन केले आहे. तिसरे प्रकरण जळगाव जिल्ह्यातील असून तेथे प्रफुल्ल लोढा या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातही राज्यातील पाच मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच केला आहे. ही तीन वेगवेगळी प्रकरणे असली तरी त्यांचा नाशिकशी संबंध जोडून गोंधळ घातला जात असल्याचे स्पष्ट होते.

प्रफुल लोढा हा कुणाचा कार्यकर्ता आहे, हे मी बोलणार नाही. पण, या सगळ्या प्रकरणाचा लवकरच खुलासा होईल. तसेच जे झाकलेले चेहरे आहेत, ते समोर येतील. हनी ट्रॅपचे खूप मोठे रॅकेट आहे. त्यात अनेक मोठे मासे अडकले आहेत. तसेच मोठे अधिकारी, मंत्री, राजकारणातले अनेक आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये आहेत. ज्याचे नाव पुढे आले, त्या प्रफुल लोढाने व्हिडीओ दाखवून अनेकांकडून पैसे घेतले आहेत. त्याने किमान 200 कोटींची वसुली केली आहे, असा काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.



हनी ट्रॅपचे प्रकरण ज्या हॉटेलमध्ये शिजल्याचे बोलले जाते, त्या हॉटेलकडे आता आजी-माजी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनीही पाठ फिरवल्याचे कळते. या हॉटेलमध्ये काही वरिष्ठ अधिकारी जीमसाठी येत होते. त्यांनीही आता इतरत्र व्यायाम, योगा करायला सुरुवात केली आहे. या 6 प्रकरणांची नाशिक शहरात जोरदार चर्चा एका महसूल खात्यातील प्रशासकीय अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून सुमारे 10 कोटींची मागणी झाल्याचा आरोप आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याने ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाची ‘सेटिंग’ झाली आणि अधिकाऱ्याने आपला तक्रार अर्ज मागे घेतला.

या प्रशासकीय अधिकाऱ्याची ‘सेटिंग’ झाली असली तरी त्याने सुमारे 3 कोटी रुपये यापूर्वीच संबंधित महिलेला हॉटेल व्यावसायिकाच्या माध्यमातून दिल्याचे समजते. असा व्यवहार खरंच झाला असेल तर इतके पैसे कोठून आणले, त्यासाठी काही बेकायदेशीर कामे केलीत का, याचाही गोपनीय तपास आता पोलिसांनी सुरू केल्याचे कळते. मात्र पोलिसांवर कुणाचाही विश्वास नाही.

संबंधित हॉटेल मालकाने एका महिलेला सोबत घेऊन नाशिकमधील एका बड्या व्यावसायिकाच्या बाबतीत हनी ट्रॅप केल्याची चर्चा आहे. या प्रकरणात थेट पैशांची मागणी करण्याऐवजी महिलेने लग्नाची गळ घातली. या व्यावसायिकाची पत्नी एका दुर्धर आजाराने वर्षभरापूर्वीच मरण पावली होती. या एकटेपणाचा फायदा घेत महिलेने व्यावसायिकाशी ‘मधुर संबंध’ प्रस्थापित केले. लग्नानंतर काही महिन्यांनी महिलेने घटस्फोटाची मागणी करत काही कोटींची खावटी मागितल्याची चर्चा आहे.

नाशिकमधील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडूनही पैशांची मागणी झाल्याचे बोलले जाते. संबंधित मुलाच्या लग्नाच्या दिवशीही बांधकाम व्यावसायिकाकडून पैसे मागण्यात आल्याची चर्चा आहे.

नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून एका मोठ्या लोकवस्तीच्या जमिनींशी संबंधित दिवाणी दावा सुरू आहे. हे प्रकरण सेट करण्यासाठी संबंधित हॉटेल व्यावसायिकाने मध्यस्थी केल्याचे काही बांधकाम व्यावसायिक सांगतात.त्याबदल्यात एका प्रकाश देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याने काहीजणांना घरांचे लालूच दाखवल्याची खात्रिलायक माहिती आहे.

पाथर्डी येथील एका हॉटेलमध्ये महापालिकेचे एक माजी आयुक्त पार्टीसाठी नेहमीच जात होते. त्याने हेच हॉटेल का निवडले? त्यांनाही ट्रॅपमध्ये अडकवण्यात आले होते का? याविषयी नाशिकच्या अनेकांना उत्सुकता आहे.

Investigation into the assets of the owner of a big hotel in Nashik in the Honey Trap case

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023