विशेष प्रतिनिधी
जालना : मेहुण्याला वाळू प्रकरणात तडीपार केल्यावर संतप्त झालेल्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, केस मागे घेईल म्हणतो आणि तू तर केस उचकायला लागला. इथे काही अधिकारी आणलेत. त्याला नाव कमवायचे काही फार हाव लागली काय?
फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका करताना ते म्हणाले, स्वतःच्या लेकराचा शब्द ओलांडून पाचशे मीटर जाऊ शकत नाही . माझ्या पोरांची तर मुडदे पडले रे देवेंद्र फडणवीस. आता परवा चार पोरांनी आत्महत्या केल्या. लाज वाटू दे ना तुला जरा. किती जातीयवादी असावे. तुझ्यासारखा माणूस मुख्यमंत्रीपदावर बसला. त्या पदाला सन्मानाने बोलले पाहिजे. तू सन्मान घेण्याचे कामच करेना. तू आधी जनतेला सन्मान देण्याचे शिक. मग तुला सन्मान मिळेल.
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्यावर पोलिसांकडून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. 3 जिल्ह्यांतून तडीपार केले आहे. जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर ,वामन मसुरराव तौर अशी पोलिसांनी तडीपारीची कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह नऊ वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई केली आहे. या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत, अशी माहितीही समोर आली आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्या जवळपास सहा आरोपींवर परभणी, जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे.सदर आरोपींवरती वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न,अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणण्याचे जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. 2019 पासून वेगवेगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत.अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही तडीपारीची कारवाई करण्यात आली असून आणखीही कारवाईचे प्रस्ताव विचाराधीन असल्याची देखील माहिती मिळत आहे.
Jarange again criticizes Devendra Fadnavis in monotonous language
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन