विशेष प्रतिनिधी
माळशिरस : Jayasingh Mohite Patil राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर सुमित्रा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन म्हणून आर्थिक घोटाळ्यांचे गंभीर आरोप झाले असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.Jayasingh Mohite Patil
भारतीय जनता पार्टीचे नातेपुते मंडल उपाध्यक्ष हरी विठ्ठल पालवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुमित्रा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये मागील दहा वर्षांत शेकडो कोटींचे गैरव्यवहार झाले आहेत. या काळात बोगस कर्ज प्रकरणे दाखवून, अधिकाऱ्यांशी संगनमत करून, सामान्य शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे जबरदस्तीने वसुली करण्यात आली आहे.Jayasingh Mohite Patil
पालवे यांनी पत्रात म्हटले आहे की, संस्थेने मागील १० वर्षांत १००० हून अधिक कर्ज प्रकरणांची बेकायदेशीर वसुली केली असून, यातून सुमारे ५० ते ६० कोटी रुपये शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात आले. अनेक प्रकरणांमध्ये सुनावणी प्रक्रियेत दीर्घ विलंब झाला आहे, तर काही प्रकरणांमध्ये वसुलीचे दाखले बनावटपणे तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. बेकायदेशीर वसुली करून संस्थेच्या तत्कालीन चेअरमन आणि संचालकांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे. यापूर्वी सहकार विभागाकडून चौकशी झाल्यानंतर तत्कालीन चेअरमनवर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी संस्थेचे मॅनेजर दिनकर भोसले यांनी चेअरमनच्या दबावामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
सध्या देखील संस्थेमार्फत अधिकाऱ्यांवर दबाव टाकून वसुली दाखले मिळवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सुमित्रा पतसंस्थेचे सर्व वसुली दाखले रद्द करून नव्याने चौकशी करावी आणि तत्कालीन चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालवे यांनी केली आहे.
या प्रकरणाची नोंद मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून, सहकार विभागाला प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या घोटाळ्यामुळे माळशिरस परिसरातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Jayasingh Mohite-Patil in Trouble, Probe Ordered into Financial Scam at Sumitra Rural Non-Agricultural Credit Society
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















